काटेवाडी, ता. ६ : सणसर (ता. इंदापूर) येथील शेतकरी इम्रान शेख यांनी अर्ध्या एकरात ८६०३२ या उसाच्या वाणाचा सेंद्रिय पद्धतीने बेणे प्लॉट तयार केला आहे. रासायनिक खते किंवा कीटकनाशकांचा वापर टाळूनही एका गुंठ्यामधून एक ते सव्वा टन ऊस उत्पादन मिळत आहे. त्यांच्या या यशस्वी प्रयोगामुळे परिसरातील इतर शेतकरी सेंद्रिय शेतीकडे आकर्षित झाले आहेत.
शेख यांच्या शेताला भेट देण्यासाठी अनेक शेतकरी येत असून, हा बेणे प्लॉट सेंद्रिय शेतीच्या यशाचा एक उत्तम नमुना ठरला आहे. प्लॉटमधील ऊस बेणे साडेपाच हजार रुपये प्रतिगुंठा या दराने विक्री केली जात आहे. विशेष म्हणजे, या दहा महिन्यांच्या पिकासाठी शेख यांनी रासायनिक खते वापरली नाहीत. त्यांनी रासायनिक खतांच्या अतिवापराबाबत सांगितले की, युरियासारख्या खतांमुळे शेतात नायट्रोजनचे प्रमाण वाढते, ज्यामुळे गवताची वाढ झपाट्याने होते. यामुळे शेतकऱ्यांना तणनाशक फवारणी आणि खुरपणी यासाठी दुप्पट खर्च करावा लागतो. यावर उपाय म्हणून जमिनीचा सेंद्रिय कर्ब (ऑरगॅनिक कार्बन) वाढवणे आवश्यक आहे. शेख यांच्या मते, जमिनीचा सेंद्रिय कर्ब किमान ०.५ टक्के असावा; परंतु बहुतेक ठिकाणी तो त्यापेक्षा कमी आढळतो.
दरम्यान, माझ्या शेतातील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण सध्या ०.५ टक्क्यांपर्यंत आहे. सेंद्रिय कर्ब वाढला की कोणतेही पीक चांगले येते, असे शेख यांनी नमूद केले. शेख हे शहाजी बापूराव निंबाळकर यांचे वाटेकरी म्हणून शेती करतात.
जीवामृत आणि शेणखताचा प्रभावी वापर
शेख यांनी शेणखत, जीवामृत, गूळ, डाळीचे पीठ आणि गोमूत्र यांचे योग्य प्रमाणात मिश्रण करून तयार केलेली स्लरी दर पंधरा दिवसांनी शेतात सोडली जाते. यामुळे जमिनीची सुपीकता वाढली असून, त्यांच्या शेतातील एका उसाचे वजन चार ते पाच किलोपर्यंत आहे. रासायनिक शेतीतही उसाचे वजन मिळते; परंतु त्यासाठीचा खर्च जास्त असल्याने नफा कमी होतो. याउलट, सेंद्रिय शेतीत उत्पादन खर्च कमी होऊन जमिनीची सुपीकता आणि उत्पन्नात वाढ होते, असे शेख यांनी सांगितले.
बेणे प्लॉटची तोडणी येत्या चार ते पाच महिन्यांत होणार असून, त्यातून किमान ४० ते ४५ टन ऊस उत्पादन अपेक्षित आहे. तीन महिन्यांपूर्वी सेंद्रिय पद्धतीने काशीफळ भोपळ्याची लागवड केली होती. त्याला चांगला बाजारभाव मिळाला. सेंद्रिय शेतीमध्ये फळ पिकाचा किंवा भाजीपाल्याचा टिपिंग पिरेड सुद्धा वाढतो
- इम्रान शेख, शेतकरी
01197
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.