पुणे

सीताफळ बागांवर पिठ्या ढेकणाचा हल्ला

CD

काटेवाडी, ता. ६ : बारामती उपविभागातील सीताफळ बागांवर पिठ्या ढेकूण (मिली बग) किडीचा प्रादुर्भाव काहीप्रमाणात आढळून येऊ लागला आहे. ही कीड सीताफळाच्या झाडांचे नुकसान करत असून, उत्पादन आणि फळांच्या गुणवत्तेवर परिणाम होत असल्याचे बारामती, इंदापूर तसेच पुरंदर तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाले आहेत.

सीताफळ व अंजीर संशोधन केंद्र जाधव वाडी येथील वनस्पती रोग शास्त्रज्ञ युवराज बालगुडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पिठ्या ढेकूण ही एक लहान, पांढऱ्या पावडरसारख्या थराने झाकलेली कीड आहे, जी सीताफळाच्या कोवळ्या पानांमधून, फांद्यांमधून, कळ्यांमधून आणि फळांमधून रस शोषते. या किडीमुळे झाडांची वाढ खुंटते, पाने आणि फळांचा आकार वेडावाकडा होतो. तसेच, ही कीड मधासारखा चिकट पदार्थ (हनीड्यू) सोडते, ज्यावर काळी बुरशी (सूटी मोल्ड) वाढते. यामुळे पाने आणि फळे काळी पडतात, ज्यामुळे फळांना बाजारात कमी बाजारभाव मिळतो. बारामती उपविभागातील सीताफळ बागांखाली बारामती २१५ हेक्टर, इंदापूर २४१ हेक्टर, दौंड १६१ हेक्टर, पुरंदर २१०० हेक्टर असे २७२५ हेक्टर क्षेत्र आहे.


अशा करा उपाययोजना
चिकट पट्टीचा वापर: सीताफळाच्या झाडाच्या खोडावर पाच सेंटिमीटर रुंदीची चिकट प्लॅस्टिक पट्टी लावावी. ही पट्टी किडीच्या पिल्लांना खोडावरून झाडावर चढण्यापासून रोखते. पिल्ले पट्टीला चिकटून मरतात, ज्यामुळे किडीचा प्रसार थांबतो.
मित्र कीटकांचा वापर: परभक्षी मित्र कीटक ‘क्रिटोलिमस मॉन्ट्रोझायरी’ (लेडीबर्ड बीटल) प्रतिएकरी ६०० या प्रमाणात १५ दिवसांच्या अंतराने तीन ते चार वेळा सायंकाळच्या वेळी बागेत सोडावेत. हे कीटक पिठ्या ढेकूण किडी खाऊन त्यांचे प्रमाण कमी करतात. यानंतर रासायनिक कीटकनाशकांची फवारणी टाळावी, कारण यामुळे मित्र कीटकांचा नाश होऊ शकतो.
जैविक बुरशीनाशक: ‘लेकॅनोसिलिअम लेकानी’ (व्हर्टिसिलिअम लेकॅनी) हे जैविक बुरशीनाशक ५ ग्रॅम आणि फिश ऑइल रोझीन सोप पाच ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. सध्याच्या पावसाळी हवामानात, जेव्हा आर्द्रता जास्त असते, तेव्हा ही फवारणी विशेषतः प्रभावी ठरते.


पिठ्या ढेकूण किडीमुळे सीताफळाच्या फळांचे उत्पादन कमी होऊ शकते. फळांचा आकार लहान आणि विकृत होतो. तसेच, काळ्या बुरशीमुळे फळांचे सौंदर्य आणि गुणवत्ता खालावते.
- युवराज बालगुडे, वनस्पती रोग शास्त्रज्ञ, सीताफळ व अंजीर संशोधन केंद्र जाधववाडी, (ता. पुरंदर)
01202

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Pawar : ''...त्यावेळी आज आपणच पेरलेल्या विषाची जाणीव त्यांना होईल, पण वेळ मात्र गेलेली असेल''

ENG vs IND: टीम इंडियाने बुमराहशिवाय दोन्ही कसोटी जिंकल्या! सचिन तेंडुलकर म्हणाला, 'त्याने सुरुवात चांगली...'

Trump Tariff India Response: ट्रम्प यांच्या अतिरिक्त टॅरिफवर आता भारतानेही स्पष्ट केली भूमिका अन् दिलं सडेतोड प्रत्युत्तर!

Tutari Express: तुतारी एक्स्प्रेसमुळे प्रवाशांचा खोळंबा, वेळापत्रकात बदल करण्याची मागणी

Virar News : अर्नाळा किनाऱ्यावरील जीवरक्षकांनी वाचवले आठ जणांचे प्राण; माजी आमदार क्षितिज ठाकूर यांनी केला जीवरक्षकांचा सत्कार

SCROLL FOR NEXT