काटेवाडी, ता. २९ ः बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या लिलाव बाजारात गुरुवारी (ता. २८) पिवळ्या मुगाने सलग तिसऱ्या बाजारात उच्चांकी भाव गाठला असून, १३,२०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. यापूर्वी १८ ऑगस्ट रोजी मूगाला १३,७०० रुपये प्रतिक्विंटल असा विक्रमी भाव मिळाला होता, तर २१ ऑगस्टला कमाल दर १,१५० रुपयांनी कमी झाला होता. तरीही मुगाला सातत्याने चांगला भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
मका, ज्वारी आणि बाजरीच्या दरांमध्ये स्थिरता कायम आहे. गहू-लोकवनची सर्वाधिक ३०७ क्विंटल आवक नोंदवली गेली. बाजारात एकूण १,५९१.१० क्विंटल धान्याची आवक झाली. यामध्ये गहू-लोकवन (३०७ क्विंटल), गहू-२१८९ (२०४ क्विंटल), बाजरी-हायब्रीड (२१७ क्विंटल), ज्वारी-हायब्रिड (१८० क्विंटल), बाजरी-महिको (१४४ क्विंटल), तूर-तांबडी (१२७ क्विंटल), ज्वारी-गावरान (११९ क्विंटल), हरभरा-गरडा (९५ क्विंटल), हरभरा-जाडा (६३ क्विंटल), खपली-लोकल (३९ क्विंटल), तूर-पांढरी (१० क्विंटल), मूग (१० क्विंटल), घेवडा (९ क्विंटल), मूग-हिरवा (९ क्विंटल), हरभरा-पांढरा (७ क्विंटल), हुलगा-लोकल (२ क्विंटल) आणि काळा घेवडा (१ क्विंटल) यांचा समावेश होता.
प्रमुख धान्यांचे दर (प्रति क्विंटल) :
उडीद-काळा: किमान ५,६००, कमाल ७,०४१
काळा घेवडा: किमान ३,०००, कमाल ३,०००
खपली-लोकल: किमान ४,७००, कमाल ४,७५१
खपली गहू: किमान ८,१००, कमाल ८,१००
गहू-२१८९: किमान २,६५०, कमाल ३,१००
गहू-लोकवन: किमान २,१००, कमाल २,८००
घेवडा: किमान ६,३५१, कमाल ६,३५१
ज्वारी-गावरान: किमान २,७००, कमाल ३,७००
ज्वारी-हायब्रिड: किमान २,०००, कमाल ३,०५१
तूर-तांबडी: किमान ४,२००, कमाल ६,०५२
तूर-पांढरी: किमान ५,५००, कमाल ५,५००
बाजरी-महिको: किमान २,६००, कमाल ३,१००
बाजरी-हायब्रीड: किमान २,०५०, कमाल २,८००
मूग-पिवळा: किमान ७,०००, कमाल १३,२००
मूग-हिरवा: किमान ५,०००, कमाल ८,२००
हरभरा-गरडा: किमान ५,०००, कमाल ५,५५०
हरभरा-जाडा: किमान ५,३५०, कमाल ६,०००
हरभरा-पांढरा: किमान ६,६००, कमाल ६,६००
हुलगा-लोकल: किमान ४,०००, कमाल ४,०००
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.