पुणे

‘छत्रपती’च्या कार्यक्षेत्रात स्मार्ट फार्मिंग

CD

काटेवाडी, ता. ४ : छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांसाठी आयोटी तंत्रज्ञानावर आधारित स्मार्ट फार्मिंग उपकरणाने शेतीत क्रांती घडवली आहे. आतापर्यंत ६० सभासदांनी या योजनेत सहभाग घेतला असून, २३ शेतकऱ्यांच्या शेतावर हे उपकरण बसवण्यात आले आहे.
भवानीनगर (ता. इंदापूर) येथील छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांसाठी शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्यासाठी आयोटी (इंटरनेट ऑफ थिंग्ज) आधारित अत्याधुनिक स्मार्ट फार्मिंग उपकरण वरदान ठरत आहे. या उपकरणात १२ प्रकारच्या सेन्सरद्वारे सभासदांना पाणी व्यवस्थापन, हवामान अंदाज, रोग- कीटक नियंत्रण आणि मातीच्या गुणवत्तेची माहिती मिळते. यामुळे शेतीचे नियोजन अधिक कार्यक्षम आणि खर्चात बचत होत आहे.
या उपकरणाद्वारे सभासद आपल्या मोबाईलवरून शेताची सद्यःस्थिती कोठूनही पाहू शकतात. जमिनीतील ओलावा, मातीचा प्रकार, हवामानानुसार पाण्याची गरज आणि झाडांची अवस्था यांचे नियोजन या यंत्राद्वारे शक्य होते. तसेच, हवामान बदलानुसार रोग आणि कीटकांच्या हल्ल्याची पूर्वसूचना मिळते. त्यानुसार प्रतिबंधात्मक फवारणीचे संदेश मिळतात, ज्यामुळे खत आणि रासायनिक खर्च नियंत्रणात राहतो, अशी माहिती ऊस विकास अधिकारी विकास टेंगले यांनी दिली.
या उपकरणाद्वारे सभासदांना शेतात किती पाऊस पडला, किती पाऊस अपेक्षित आहे, वाऱ्याची दिशा आणि वेग याची माहिती मिळते. पुढील २४ तास आणि १५ दिवसांचा हवामान अंदाज उपलब्ध होतो. ज्यामुळे सभासद पुढील कामांचे नियोजन करू शकतात. तापमान सेन्सरद्वारे माती आणि वातावरणातील तापमान मोजले जाते, जे पिकांच्या वाढीसाठी महत्त्वाचे आहे. मातीच्या तापमान सेन्सरमुळे संभाव्य रोगांचा अंदाज घेता येतो.

पानांचे ओलाव्यापासून क्रॉप बाष्पीभवनापर्यंत
पानांवरील ओलावा मोजण्यासाठी सेन्सरचा वापर होतो, ज्यामुळे पाऊस, धुके किंवा सिंचनामुळे पिकांवर होणारा परिणाम समजतो. पर्जन्य सेन्सर पावसाची तीव्रता मोजते, तर क्रॉप बाष्पीभवन (ETC) सेन्सर पाण्याच्या नुकसानीचे प्रमाण दर्शवते. लक्स मीटरद्वारे पिकांना उपलब्ध प्रकाशाचे प्रमाण मोजले जाते, जे पिकांच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे. सौर तीव्रतेचे निरीक्षण करून प्रकाश संश्लेषण आणि कीटक प्रादुर्भावाची माहिती मिळते. वाऱ्याचा वेग सेन्सरद्वारे फवारणीचे नियोजन करून रासायनिक प्रवाह कमी होतो.

अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून ऊस शेतीमध्ये अधिकाधिक उत्पादन वाढ कशी होईल, यासाठी कारखान्याच्या वतीने सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. सभासद देखील हे आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करून आपली शेती स्मार्ट बनवत आहेत. आगामी काळामध्ये जास्तीत जास्त सभासदांना यामध्ये सहभागी करून घेऊन हे तंत्रज्ञान त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा कारखान्याच्या वतीने प्रयत्न करण्यात येणार आहे.
- पृथ्वीराज जाचक, अध्यक्ष, श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना, भवानीनगर

आर्थिक सहभाग रक्कम (रुपये)
सहभागी सभासद .... ९०००
कारखाना............६,७५०
व्हीएसआय पुणे...... ९,२५०
एकूण...........२५,०००

सभासदांना अटी पूर्ण कराव्या लागतील
सभासदांनी ९००० रुपये कारखान्याच्या लेखा परिक्षण विभागाकडे जमा करावेत आणि पावती ऊस विकास विभागाकडे नोंदवावी. ऊस लागवडीसाठी ठिबक सिंचनाचा वापर बंधनकारक आहे. रोपांची लागवड केल्यास ऊस उत्पादन वाढण्यास मदत होईल.

01372

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vanraj Andekar vs Govind Komkar: नाना पेठेत थरार! वर्षभरानंतर बदला घेतला, नेमकं काय होतं वनराज आंदेकर प्रकरण?

Bhagwant Mann health Update: पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांची प्रकृती खालावली ; मोहालीतील फोर्टिस रुग्णालयात दाखल!

Pro Kabaddi: बेंगळुरू बुल्सची बत्तीगुल! यू मुंबाचा ४८-२८ ने एकतर्फी विजय; अजित चौहान ठरला सामन्याचा हिरो

Mira Bhayandar: पाच हजार कोटींचं ड्रग्ज जप्त, मीरा भाईंदर पोलिसांची मोठी कारवाई

Pune Crime: वनराज आंदेकरांच्या खुनाचा बदला! गोविंदा कोमकरची तीन गोळ्या झाडून हत्या; पुणं हादरलं

SCROLL FOR NEXT