पुणे

बारामतीत यु-डायसची कामगिरी धमाकेदार

CD

काटेवाडी, ता. १० : बारामती तालुक्यात यु-डायस प्लसचे काम ९० टक्क्यांहून अधिक यशस्वीपणे पूर्ण झाले आहे. शिक्षण विभागाच्या अहवालानुसार तालुक्यातील शाळांनी विद्यार्थ्यांची नोंदणी, आधार सत्यापन आणि जनरेशन प्रभावीपणे पार पाडले आहे, अशी माहिती गटशिक्षणाधिकारी नीलेश गवळी यांनी दिली.
शिक्षण विभागाने यु-डायस प्लस प्रणालीवर शाळा, विद्यार्थी आणि शिक्षकांची माहिती भरण्यासाठी २० सप्टेंबर २०२५ पर्यंत मुदत दिली आहे. यासोबतच विद्यार्थ्यांचे आधार कार्ड अद्ययावत करण्यासाठी ३० सप्टेंबरपर्यंत वेळ देण्यात आला आहे. शिक्षण विभागाने सर्व शाळांना यु-डायस प्रणालीत शाळा, शिक्षक आणि विद्यार्थ्यांची सविस्तर माहिती भरण्याचे निर्देश दिले आहेत. यामध्ये शाळा व्यवस्थापन प्रकार, माध्यम, सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन, शाळा आराखडा, आपत्ती व्यवस्थापन, दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी सुविधा, आरोग्य तपासणी, आणि इको क्लब यासारख्या बाबींचा समावेश आहे. तसेच, सर्व विद्यार्थ्यांचे आधार सत्यापन आणि अपार आयडी तयार करणे, तसेच ड्रॉपआउट विद्यार्थी शून्य असल्याची खात्री करण्याचे आदेश आहेत. यंदा शाळांच्या संच मान्यता यु-डायस माहिती आणि आधार अद्ययावत विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार ठरणार आहे, असे देखील शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.

४,९०५ विद्यार्थी ड्रॉपआउट
बारामती तालुक्यातील शिक्षण विभागाच्या अहवालानुसार, ४३३ शाळांमध्ये ९०,३५८ विद्यार्थ्यांची नोंदणी झाली आहे. यापैकी ८७,५४६ विद्यार्थ्यांचे आधार सत्यापन (९६.९४ टक्के ) आणि ७९,०२७ विद्यार्थ्यांचे आधार जनरेशन (९१.३६ टक्के ) पूर्ण झाले आहे. एकूण माहिती संकलनाचे काम ९१.७ टक्के पूर्ण झाले आहे. बारामती तालुक्यात ४,९०५ विद्यार्थी ड्रॉपआउट म्हणून नोंदले गेले आहेत. आर्थिक अडचणी, कौटुंबिक जबाबदाऱ्या किंवा स्थलांतर यामुळे हे घडते. यु-डायस प्लस प्रणालीत ही नोंद आहे. शिक्षण विभागाने ड्रॉपआउट शून्य करण्याचे निर्देश दिले असून, यासाठी विशेष उपाययोजना आवश्यक आहेत.

प्रकारानुसार प्रगती:
प्रकार***शाळा***विद्यार्थी***आधार सत्यापन***आधार जनरेट
खासगी अनुदानित शाळा***६५ ***४३,८५३***४२,४२५***४०,९३७
सामाजिक कल्याण अनुदानित शाळा*** १*** ३९***३९***३९
सामाज कल्याण विनाअनुदानित शाळा ***३***९७***९३****८७
खासगी २० टक्के *** ८***१,११३***९५२****१,०८३
खासगी अनुदानित***१*** १४२***१४०***१०२
स्वयंअर्थसाहित***६०***२९,६००***२८,३३७***२४,३७३
नगर पालिका***८***१,१९१***१,१११***९३१
जिल्हा परिषद : २७७***१३४४३***१२८७५***१०८२१
व्हीजेएनटी खासगी अनुदानित *** ३*** ८८०*** ८६१***८०४

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup, IND vs UAE: ५ षटकार अन् ४ चौकार... भारताचा फक्त २७ चेंडूत विजय! युएईला दिला धोबीपछाड

Marathi Sahitya Sammelan : साताऱ्यातील संमेलनाला एक कोटी अतिरिक्त निधी, मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांची घोषणा; बोधचिन्हाचे अनावरण

China: तिबेटप्रमाणे भूतानची जमीन हडपण्याची चीनची तयारी; आता 'या' नव्या जागेवरही दावा

Pune News : पुण्यातील खड्ड्यांची समस्या कायम, 'पीएमसी रोड मित्र' ॲपवर १२७४ तक्रारी

IND vs UAE: कुलदीप यादवच्या फिरकीला शिवम दुबेची साथ अन् युएई संघ ६० धावांच्या आत ऑलआऊट

SCROLL FOR NEXT