काटेवाडी, ता. १० : शहरात सकल धनगर/ओबीसी समाजाने विनापरवाना मोर्चा काढल्याप्रकरणी लक्ष्मण हाके (रा. सांगोला) यांच्यासह १४ जणांविरुद्ध बारामती शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग करून आणि पोलिसांनी परवानगी नाकारलेली असतानाही हा मोर्चा काढण्यात आल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.
चंद्रकांत वाघमोडे (रा. माळेगाव, ता. बारामती), अमोल सातकर (रा. जळोची, बारामती), पांडुरंग मेरगळ (रा. रावणगाव, ता. दौंड), नवनाथ पडळकर, किशोर मासाळ, गोविंद देवकाते (तिघे रा. बारामती), किशोर हिंगणे (रा. पाटस रोड, ता. बारामती), बापूराव सोलनकर (रा. ढेकळवाडी, ता. बारामती), विठ्ठल देवकाते (रा. नीरा वागज, ता. बारामती), काळुराम चौधरी (रा. आमराई, बारामती), बापू कवले (रा. सुपा, ता. बारामती), मंगेश ससाणे (रा. हडपसर), लक्ष्मण हाके (रा. सांगोला) आणि जी. बी. गावडे (रा. मळद, ता. बारामती) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहे. या १४ जणांनी दीड ते दोन हजार लोकांचा जमाव जमवून शारदा प्रांगण ते प्रशासकीय भवनापर्यंत घोषणाबाजी करत मोर्चा काढला होता. याप्रकरणी सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक महेश माने यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सकल धनगर/ओबीसी समाजाविरोधात मनोज जरांगे यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करा, अशी मागणी वाघमोडे, सातकर यांनी केली होती. यासाठी त्यांनी ५ सप्टेंबर रोजी बारामतीतील शारदा प्रांगण ते प्रशासकीय भवनापर्यंत मोर्चाचे आयोजन केले होते. मात्र, या तारखेला ईद-ए-मिलाद सण, तसेच ६ सप्टेंबर रोजी गणेश विसर्जन आणि ९ सप्टेंबर रोजी ईद-ए-मिलाद मिरवणूक असल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाकारली होती. पोलिसांनी आयोजकांना लेखी पत्राद्वारे मोर्चा १० सप्टेंबरनंतर काढण्यास सांगितले होते. तसेच भारतीय नागरिक सुरक्षा संहितेनुसार नोटीसही बजावण्यात आली होती. तरीही ५ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता मोर्चा काढण्यात आला होता. दरम्यान, पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मोर्चादरम्यान बंदोबस्त तैनात केला होता. सध्या या प्रकरणाचा तपास पोलिस हवालदार बनसोडे करत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.