पुणे

रब्बी हंगामासाठी महाकृषी अॅपवर मोहिमांची नोंदणी सक्तीची

CD

काटेवाडी, ता. १७ ः २०२५ च्या रब्बी हंगामात शेतकऱ्यांच्या उत्पादकतेला चालना देण्यासाठी विविध मोहिमांची अंमलबजावणी महाकृषी अॅपद्वारे करणे अनिवार्य करण्यात आले आहे. कृषी आयुक्तालयाने याबाबत सर्व विभागीय कृषी सहसंचालक आणि जिल्हा कृषी अधिकाऱ्यांना सूचना जारी केल्या आहेत. यामुळे शेतकरी अधिक आधुनिक तंत्रज्ञान आणि योजना आत्मसात करू शकतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
२०२५ च्या खरीप हंगामात महाकृषी अॅपवर ४, ३०, ७३३ मोहिमांची नोंदणी झाली असून, शेतकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळाल्याचे कृषी आयुक्तालयाने नमूद केले आहे. या पार्श्वभूमीवर रब्बी हंगामासाठीही अशाच प्रकारे मोहिमांची वेळेवर आणि अचूक नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अॅपवर सहायक कृषी अधिकारी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना लॉगिन आयडी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. दरम्यान, २०२५-२६ च्या रब्बी हंगामासाठी पीक प्रात्यक्षिक आणि प्रमाणित बियाणे वितरणाबाबत अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून, शेतकरी त्याचा लाभ घेऊ शकतात. यामुळे मोहिमांची अंमलबजावणी अधिक प्रभावी होईल, अशी अपेक्षा आहे. कृषी आयुक्तालयाने सर्व संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना या मोहिमांची नोंदणी महाकृषी अॅपवर तात्काळ करण्याचे निर्देश दिले आहेत. यामुळे शेतकऱ्यांना आधुनिक शेतीच्या दिशेने पावले टाकण्यास मदत होईल.

रब्बी हंगामासाठी मोहिमांचे नियोजन
रब्बी हंगामात शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान आणि शाश्वत शेती पद्धतींचा अवलंब करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी खालील प्रमुख मोहिमांची नोंदणी महाकृषी अॅपवर करणे बंधनकारक आहे :
१) पीक स्पर्धाः प्रत्येक गावात किमान एक स्पर्धक सहभागी करणे.
२) सीआरए तंत्रज्ञानः फळबाग लागवडीत आधुनिक तंत्राचा वापर.
३) जमीन सुपीकताः खत वापरासाठी प्रति गाव किमान एक प्रात्यक्षिक.
४) बायोचार निर्मितीः शेतकऱ्यांमध्ये जनजागृती.
५) डिजिटल शेतीशाळाः पाणी फाउंडेशनच्या उपक्रमात सहभाग.
६) बीज प्रक्रिया आणि उगवणक्षमताः घरगुती चाचणी पद्धतीद्वारे प्रात्यक्षिक.
७) कृषी निविष्ठा आणि जनजागृतीः व्हॉट्सअॅप ग्रुप, हिरवळीचे खत आणि निविष्ठा विक्रेत्यांच्या बैठका.
८) कृषी व्यवसायः शेतकऱ्यांना उद्योजकतेसाठी प्रोत्साहन.
९) ऊस पाचट व्यवस्थापनः शाश्वत पद्धतींचा अवलंब.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PAK vs UAE Live: बिचारे... PCB ने खेळाडूंना तोंडावर पाडले, बॅगा घेऊन स्टेडियमवर पोहोचले; मॅच रेफरी Andy Pycroft च राहिले, टॉसही हरले

Pune: 'आर्टी'च्यावतीने शनिवारी पुण्यात अभियंता उद्योजक कार्यशाळा

Latest Marathi News Updates: कन्नडच्या एसडीएम कार्यालयासमोर कोळी समाजाचे आमरण उपोषण

Pachod News : गुन्हा दाखल केलेल्या इसमांवर पोलिसांनी कारवाई न केल्याने एकाने व्हिडीओ बनवून केले विष प्राशन; घाटी रुग्णालयात उपचार सुरू

PAK vs UAE Update: पाकिस्तानची लाचारी पुन्हा दिसली... पैशांसाठी आत्मसन्मान ठेवला गहाण; Jay Shah यांनी कान टोचताच खेळायला तयार

SCROLL FOR NEXT