पुणे

बारामती, सुपे बाजारात बाजरीची उच्चांकी आवक

CD

काटेवाडी, ता. १० ः बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य बाजारात व सुपे उपबाजारात बुधवारी (ता. ८) बाजरीची एकूण उच्चांकी ४२०० पोत्यांची आवक झाली. यंदा समाधानकारक पाऊस आणि पोषक हवामानामुळे बाजरीचे उत्पादन वाढले आहे. याचा परिणाम म्हणून शेतकऱ्यांना चांगले दर मिळाले असून, शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे.
बुधवारी सुपे उपबाजारात बाजरीला प्रति क्विंटल कमाल ३२००, किमान २६६०, तर सरासरी २८५० रुपये दर मिळाला. तसेच, गुरुवारी (ता. ९) मुख्य बाजार आवारात १२८० पोत्यांची आवक झाली. यावेळी कमाल ३५००, किमान २२०० आणि सरासरी ३००० रुपये दर मिळाला.
बाजार समितीचे सभापती विश्वास आटोळे आणि उपसभापती रामचंद्र खलाटे यांनी शेतकऱ्यांना शेतमाल स्वच्छ आणि वाळवून आणण्याचे आवाहन केले आहे. यामुळे शेतमालाला आणखी चांगला दर मिळू शकतो. तसेच, शेतकऱ्यांनी आपला माल थेट बाजार समितीच्या आवारात विक्रीस आणावा, असेही त्यांनी सांगितले.
बाजरीची आवक बारामती तालुक्यासह शिरूर, दौंड, पुरंदर, नीरा, जेजुरी आणि मोरगाव परिसरातून होत आहे. स्थानिक आणि बाहेरील पेठेतील खरेदीदारांमुळे बाजरीला मागणी वाढली आहे, असे सचिव अरविंद जगताप यांनी सांगितले.

01488

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET Paper Leak : नीट पेपरफुटी प्रकरणात आणखी एक तज्ज्ञ प्राध्यापिका रडारवर; मनीषा हवालदारचे सीबीआय चौकशीत धक्कादायक खुलासे !

Beed Crime News : बीड पुन्हा हादरले! सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुनरावृत्ती; उमेश दळवीची निघृण हत्या, बेदम मारहाणीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल

Latest Marathi News Live Update : पुणे शहरात उद्यापासून प्रतिबंधात्मक आदेश लागू; परवानगीशिवाय सभा, मिरवणुकांना बंदी

दिवाळीनंतर नाही तर दिवाळीपूर्वीच होणार रणबीर कपूरचा रामायण सिनेमा रिलीज !

Pune News: पुण्यात आज मेघगर्जनेसह पावसाची शक्यता; उकाड्यातून दिलासा; पुणेकरांना आज पावसाची साथ; हवामान विभागाचा अंदाज

SCROLL FOR NEXT