पुणे

कन्हेरी येथे फार्मर कप उपक्रमांतर्गत प्रशिक्षण

CD

काटेवाडी, ता. १४ : कन्हेरी (ता. बारामती) येथे महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभाग, आत्मा पुणे आणि पाणी फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने ‘सत्यमेवजयते फार्मर कप’ उपक्रमांतर्गत क्षेत्रीय अधिकारी व कर्मचारी प्रशिक्षण बुधवारी (ता. १२) पार पडले.
या कार्यक्रमात बारामती आणि इंदापूर तालुक्यांचे कृषी अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले. यामुळे शेतकऱ्यांना शाश्वत शेतीच्या तंत्रांचा प्रसार होईल, अशी अपेक्षा आहे. या प्रशिक्षणाची सुरुवात बुधवारी कन्हेरी फळ रोपवाटिका येथे झाली. यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी टी. के. चौधरी बोलताना म्हणाले की, ‘‘फार्मर कप ही महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी स्पर्धा आहे, जी पाणी फाउंडेशनने सुरू केली आहे. राज्यभरातील अनेक जिल्ह्यांतून शेतकरी गट वर्ष २०२४- २५ साठी सहभागी होत आहेत. सरकारने वर्ष २०२६- २७ पर्यंत १५ हजार शेतकरी उत्पादक गट तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवले असून, फार्मर कपद्वारे शेतकऱ्यांना तंत्रज्ञान आणि बाजारपेठेशी जोडले जाणार आहे. ही स्पर्धा शेतकऱ्यांना एकत्र येऊन चांगल्या पिकांसाठी प्रोत्साहन देते, ज्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत होईल. प्रशिक्षणांमुळे तालुका स्तरावर फार्मर कपची अंमलबजावणी सुलभ होईल. शेतकऱ्यांसाठी हा उपक्रम खूप उपयुक्त ठरेल.’’
याप्रसंगी पाणी फाउंडेशनचे विभागीय समन्वयक सुखदेव भोसले, पृथ्वीराज लाड, मयूर साळुंखे, अपूर्वा भारमल आणि मानसी बर्गे यांनी फार्मर कप स्पर्धेबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले.
यावेळी बारामतीचे तालुका कृषी अधिकारी सचिन हाके, इंदापूरचे तालुका कृषी अधिकारी दीपक गरगडे, उपविभागीय कार्यालयातील तंत्र अधिकारी रश्मी जोशी आणि कृषी अधिकारी राजेंद्र डोंबाळे उपस्थित होते.

01530

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder Shortage: पोळी, भाकरीलाही इंधनटंचाईचे ‘चटके’; प्रतिनग दोन ते पाच रुपयांनी दरवाढ

Ahilyanagar News: गुरुजींची बढतीसाठी खटपट! अहिल्यानगर जिल्हा परिषदेत एजंटांनी टाकले गळ, नियमातील संदिग्धतेने फावले..

Harish Rana Case: १३ वर्षांपूर्वी हरीश राणाला काय झालेलं? परदेशात विषारी इंजेक्शन टोचतात; पण भारतात इच्छामरण कसं दिलं जातं? कायदा काय सांगतो?

"खरे हिरो बाबाच!" शिवम दुबेने T20 World Cup चे मेडल घातलं वडिलांच्या गळ्यात; पाहा Video

Female Foeticide Law : 7 ते 10 वर्षांची जेल आणि थेट कारवाई! स्त्रीभ्रूण हत्येचा कलंक पुसण्यासाठी सरकारने आखला 'हा' प्लॅन; आरोग्यमंत्र्यांचा महत्त्वपूर्ण निर्णय

SCROLL FOR NEXT