काटेवाडी, ता. २० : लासुर्णे (ता. इंदापूर) येथील श्री नीलकंठेश्वर विद्यालयामध्ये ‘आनंद मेळावा व बाल बाजार’ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध स्टॉल्स लावले असून खरेदी-विक्रीचा अनुभव घेतला. यामुळे मुलांना पैशांचे व्यवहार, कमावणे व खर्च करणे याची प्रत्यक्ष जाणीव झाली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे तालुकाध्यक्ष तेजसिंह पाटील, अमोल पाटील, मुख्याध्यापक ओंबासे, सचिन खरवडे यांच्यासह शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, ग्रामस्थ, शिक्षक उपस्थित होते. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या मनातील अभ्यासाचा ताण कमी होऊन त्यांना विरंगुळा मिळाला. तसेच, त्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळाला, अशी भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली. शाळेतील या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.