पुणे

मक्‍याची हमीभावाने जळोचीत खरेदी सुरू

CD

काटेवाडी, ता. १७ : बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जळोची उपबाजार आवारात मक्‍याची हमीभावाने खरेदी सुरू झाली आहे. बाजारात लिलावामध्ये मक्‍याचे दर हमीभावापेक्षा कमी मिळत असल्याने शेतकरी संघटनांच्या मागणीनुसार हे खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे.
केंद्र शासनाच्या किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत हंगाम २०२५-२६ साठी मका खरेदी सुरू आहे. मक्‍याचा हमीभाव रुपये २,४०० प्रतिक्विंटल इतका आहे. प्रतिएकर जास्तीत जास्त ९.५० क्विंटल मका खरेदी केला जाणार आहे. ज्या शेतकऱ्यांनी अद्याप ऑनलाइन नोंदणी केलेली नाही, त्यांनी २८ फेब्रुवारी २०२६ पर्यंत नोंदणी करून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन बारामती बाजार समितीने केले आहे. शेतकऱ्यांनी मका वाळलेला आणि स्वच्छ करूनच आणावा, असे आवाहन बाबालाल काकडे नीरा कॅनॉल संघाचे अध्यक्ष सतीश काकडे यांनी केले आहे. याप्रसंगी बाजार समितीचे सचिव अरविंद जगताप, पुरवठा अधिकारी तितिक्षा बारापात्रे, नीरा कॅनॉल संघाचे मॅनेजर सुरेश काकडे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कागदपत्रे द्या किंवा जागा खाली करा...; एसआरएने धारावी पुनर्विकास प्रकल्पातील रहिवाशांना अंतिम नोटीस बजावली, किती दिवसांची?

MHADA: म्हाडाचे घर घेण्याची संधी! लॉटरीमध्ये ८,००० घरांचा समावेश, पण कुठे? जाणून घ्या ठिकाण आणि प्रकिया...

Indore EV Fire Accident: इंदौरसारखी दुर्घटना टाळायचीये? मग इलेक्ट्रिक कार चार्ज करताना अजिबात करू नका 'या' 5 चुका

Latest Marathi News Live Update : कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक ठिकाणी गारांचा पाऊस

Stray Dogs Attack : मोकाट कुत्र्यांचा कहर; सात वर्षांच्या चिमुरडीवर हल्ला!

SCROLL FOR NEXT