पुणे

अस्तित्वापुरताच ‘तुतारी’चा आवाज

CD

पक्षनामा- राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष
..........
अस्तित्वापुरताच ‘तुतारी’चा आवाज

रविकिरण सासवडे : सकळा वृत्तसेवा
काटेवाडी, ता. २७ : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे होमपीच असणाऱ्या पुणे जिल्ह्यात महापालिका निवडणुकांमध्ये अपयश आल्यानंतर मत विभाजन टाळण्यासाठी राष्ट्रवादीचे दोन्ही गट जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी एकत्र आले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दोन्ही दोन्ही गटाची धुरा स्वतःच्या खांद्यावर घेतली असल्याचे चित्र दिसते. या निवडणुकीपासून सध्यातरी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे वरिष्ठ नेते दूर असल्याचे चित्र आहे.
राष्ट्रवादीच्या दोन गटांमधील समन्वयामुळे जिल्ह्यात पक्षाची ताकद वाढल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात शरद पवार यांच्या पक्षाने काही तालुक्यांत ‘तुतारी वाजवणारा माणूस’ हे स्वतःचे चिन्ह वापरले असले, तरी बहुतांश जागांवर अजित पवार यांच्या पक्षाचे ‘घड्याळ’ चिन्ह वापरले जात आहे. कागदावर जरी हे चित्र एकीकरण, युती किंवा आघाडीची वाटत असले, तरी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे वरिष्ठ नेते या निवडणूक प्रक्रियेपासून अंतर राखून आहेत. तालुक्यातील स्थानिक नेत्यांवरच या निवडणुकीची सारी भिस्त सोपवलेली सध्या तरी दिसते.
मुळशी तालुक्यात दोन जिल्हा परिषद जागा आणि चार पंचायत समिती जागा ‘तुतारी’ चिन्हावर लढवल्या जात आहेत. खडकवासला येथे एक पंचायत समिती उमेदवार ‘तुतारी’वर उभा आहे. आंबेगावमध्ये तीन जिल्हा परिषद आणि चार पंचायत समिती उमेदवार ‘तुतारी’ चिन्हावर लढत आहेत. खेडमध्ये दोन पंचायत समिती उमेदवार ‘तुतारी’वर आहेत. मावळमध्ये दोन जिल्हा परिषद आणि तीन पंचायत समिती उमेदवार ‘तुतारी’ चिन्हावर निवडणूक लढवत आहेत. या ठिकाणी शरद पवार गट, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीसोबत युती करून लढत आहे. मात्र, भोर, राजगड, इंदापूर, दौंड, पुरंदर, हवेली आदी तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या ३५ जागांवर शरद पवार यांच्या पक्षाचे उमेदवार ‘घड्याळ’ चिन्हावर लढत आहेत. पुरंदर, भोर, इंदापूर, बारामती आणि दौंड या तालुक्यांत अजित पवार यांच्या पक्षासोबत स्थानिक पातळीवर समन्वय असल्याचे दिसते.

बॅनरवर दोन्ही गटांचे फोटो
ज्या भागात शरद पवार पक्षाची स्थानिक ताकद मजबूत आहे, तेथे ‘तुतारी’ चिन्ह वापरून पक्षाची स्वतंत्र ओळख टिकवली जात आहे. मात्र, बहुतांश जागांवर ‘घड्याळ’ चिन्हाचा वापर हा अजित पवार यांच्यासोबतच्या व्यावहारिक समन्वयाचा भाग आहे. इंदापूर तालुक्यात ही रणनीती आधीच दिसली, जेथे हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता पाटील-ठाकरे या ‘घड्याळा’च्या चिन्हावर लढत आहे. बारामतीसारख्या ठिकाणी अजित पवार यांचा प्रभाव असल्याने ‘घड्याळ’ चिन्हावर सर्व उमेदवार उभे आहेत. या ठिकाणी फोडाफोडीचे राजकारण होत असून त्याचा फटका राष्ट्रवादीसह भाजपला देखील बसला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात निवडणूक लढवणारे युगेंद्र पवार हे या सर्व निवडणूक प्रक्रियेपासून दूर आहेत. या दोनही तालुक्यातील बॅनरवर शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांचे फोटो दिसतात. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आहेत, हे दाखवले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: कुटुंबियांना भेटताच अश्रुंचा बांध फुटला, सुप्रिया सुळेंसह सुनेत्रा पवारांनी हंबरडाच फोडला; काळीज पिळवटून टाकणारा व्हिडिओ समोर

वडिलांचे स्वप्न पूर्ण केल पण स्वतःचं तसंच राहिलं; अजितदादांसोबत अपघातात २९ वर्षीय पिंकी मालीचा मृत्यू

Latest Marathi News Live Update : मनोज जरांगे-पाटील अंत्यदर्शनाला आले

Ajit Pawar Plane Crash: अजितदादांमुळे बीडकरांचं ४५ वर्षांचं स्वप्न झालं होतं पूर्ण; पालकमंत्रीपद स्वीकारल्यापासून 'हे' बदल केले

तो वाद अन् 'रणपती शिवराय' चित्रपटाची रिलीज डेट बदलली; 'या' तारखेला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार सिनेमा

SCROLL FOR NEXT