पुणे

दौंडसाठी ३८ कोटींचा दुष्काळ निधी मंजूर

CD

खुटबाव, ता. १४ : दौंड तालुक्यामध्ये ३८ कोटी रुपये दुष्काळ निधी मंजूर झाला आहे. त्यापैकी आत्तापर्यंत २३ कोटी ७० लक्ष रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आले आहेत, अशी माहिती दौंडचे आमदार राहुल कुल यांनी दिली.

तालुक्यामध्ये सन २०२३-२४ मध्ये कमी स्वरूपाचा पाऊस झाला. यामुळे आमदार कुल यांनी दौंड तालुका हा दुष्काळग्रस्त तालुका म्हणून जाहीर करावा यासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा केला. या पाठपुराव्यामुळे राज्य शासनाने तालुक्याला मध्यम स्वरूपाचा दुष्काळ जाहीर केला. तालुक्यातील जिरायती व बागायती भागात कमी जास्त प्रमाणात प्रति हेक्टरी रुपये याप्रमाणे तालुक्यासाठी ३८ कोटींचा निधीचे वाटप करण्यात येणार आहे. या कामी शासनाच्या डीबीटी पोर्टलवर याद्या अपलोड करण्यात आल्या आहेत. हा निधी केवायसी नंतर थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आला आहे. यासाठी दौंडचा महसूल विभाग व कृषी विभाग यांच्या वतीने गावोगावचे तलाठी व कृषी सहाय्यक यांनी गाव निहाय याद्या बनवून अपलोड केल्या होत्या. तहसीलदार अरुण शेलार व तालुका कृषी अधिकारी राहुल माने यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल व कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी चांगले काम केल्यामुळे दौंडला दुष्काळ निधी वितरित करण्यात आला, अशी माहिती कुल यांनी दिली.

दरम्यान, गेल्या वर्षी सर्वात मोठा दुष्काळ पडला होता. आमदार कुल यांच्या प्रयत्नामुळे तालुक्यातील प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले, असे कासुर्डी येथील शेतकरी गोपीनाथ भोंडवे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

IND vs ENG 2nd Test: भारताची ऐतिहासिक विजयाच्या दिशेने कूच! Akash Deep चा भेदक मारा, इंग्लंडची उडवली झोप

Mumbai Airport Wildlife Smuggling : खळबळजनक! मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत तब्बल ४५ प्राणी सापडले

Central Railway: मध्य रेल्वेची ज्येष्ठांसाठी मोठी घोषणा

Rabri Devi Statement : तेजप्रताप यादव प्रकरणावर पहिल्यांदाच राबडी देवींनी सोडलं मौन अन् जाहीर कार्यक्रमात, म्हणाल्या...

SCROLL FOR NEXT