पुणे

देवकरवस्ती परिसरात तीन बिबट्यांचे थैमान

CD

खुटबाव, ता. १४ : गलांडवाडी (ता. दौंड) देवकरवस्ती येथे तीन बिबट्यांनी थैमान घातले. गोपालक बबनराव देवकर यांच्या पाच वासरांचा बिबट्यांनी फडशा पाडला आहे. पहिल्या घटनेत १५ दिवसांपूर्वी झालेल्या दोन वासरांचा तर शनिवारी (ता. १०) झालेल्या दुसऱ्या घटनेमध्ये तीन वासरांचा फडशा पाडला आहे. यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.

शेलार वस्ती, पासलकर वस्ती व चव्हाण वस्ती परिसरात बिबट्याचा वावर वाढला आहे. वनविभागाकडून पिंजरे अपुरे असल्याचे कारण देत
१५ दिवस होऊनही पिंजरा बसवण्यासाठी टाळाटाळ केली जात आहे. या संदर्भात ग्रामपंचायत गलांडवाडीने वन विभागाकडे निवेदन दिले आहे. सरपंच रमेश पासलकर म्हणाले की, ग्रामस्थ कुसूम पासलकर यांच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये दोन बिबटे गोठ्यामध्ये येत असताना कैद झाले आहेत. एकट्या गलांडवाडी परिसरामध्ये ३ पेक्षा जास्त बिबट्यांचा वावर आहे. त्यामुळे रात्री अपरात्री घराबाहेर व शेतामध्ये जाणे जीवघेणे बनले आहे. प्रशासनाने गलांडवाडी परिसरामध्ये पिंजरा लावून त्वरित बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येत आहे.

गलांडवाडीचे माजी सरपंच उत्तम खाडे यांच्या वासराचा सोमवारी (ता.१३) बिबट्याने फडशा पाडला आहे. त्यामुळे एका पाठोपाठ ३ घटना घडल्याने गलांडवाडी परिसरात भीतीचे वातावरण आहे.

रात्रीच्या वेळी शेतीमध्ये पाणी देण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांच्या विवंचनेत फिरस्त्या बिंबट्यांमुळे वाढ झाली आहे. यामुळे ग्रामपंचायतीने गलांडवाडीने वन विभागाकडे पिंजरे लावण्यासाठी निवेदन दिले आहे.


ग्रामस्थ कुसुम पासलकर यांच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये २ बिबटे गोठ्यामध्ये येत असताना कैद झाले आहेत. एकट्या गलांडवाडी परिसरामध्ये तीन पेक्षा जास्त बिबट्यांचा वावर आहे. त्यामुळे रात्री अपरात्री घराबाहेर व शेतामध्ये जाणे जीवघेणे बनले आहे. प्रशासनाने गलांडवाडी परिसरामध्ये पिंजरा लावून त्वरित बंदोबस्त करावा.
- रमेश पासलकर, सरपंच

01030

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubhanshu Shukla Research : शुभांशु शुक्लांनी अंतराळात केला थरारक प्रयोग! बनले 'या' खास गोष्टीवर संशोधन करणारे पहिले भारतीय..

Nagpur Fraud: खोट्या रजिस्ट्रीच्या आधारे उचलले ३८ लाखांचे गृहकर्ज

Pune News : रस्त्याच्या मधोमध झाडामुळे अपघाताचा धोका; प्रयेजा सिटी सोसायटी परिसरातील स्थिती, जवळच शाळा असल्याने चिंता

Latest Maharashtra News Live Updates : हिंदीविरोधातील स्टॅलिन यांच्या लढ्याला आमच्या शुभेच्छा - संजय राऊत

Pune News : नानासाहेब पेशवेंच्या समाधीची दुरवस्था; परिसरात कचऱ्याची समस्या; महापालिकेच्या दुर्लक्षामुळे ऐतिहासिक वारसा उपेक्षित

SCROLL FOR NEXT