पुणे

गलांडवाडीतील म्हसोबाचे टुमदार मंदिर

CD

गलांडवाडी (ता. दौंड) येथील म्हसोबा मंदिर पूर्वी माळवदी होते. गावामध्ये कुणालाही साप चावला तरी ग्रामस्थ आवर्जून या मंदिरासमोर संबंधित साप चावलेल्या व्यक्तीला आणायचे. त्यामुळे साप चावलेली व्यक्ती बरी व्हायची, अशी श्रद्धा होती. ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यास सुरुवात केली.


प्रत्येक ग्रामस्थांच्या शेताच्या क्षेत्रानुसार वर्गणी ठरवण्यात आली व सगळ्यांनी आपापल्या ऐपतीनुसार वर्गणी दिली. मध्यंतरी गावातील एका ज्येष्ठ व्यक्तीचे कोरोनाने निधन झाले. त्यावेळी गावचे तत्कालीन सरपंच गजानन कदम यांनी म्हसोबा देवासमोर मागणी केली व गावामध्ये कोरोनाने कोणाचे मरण येऊ नये असा म्हसोबा देवासमोर आशीर्वाद मागितला. त्यानंतर गावामध्ये एकही कोरोना रुग्ण सापडला नाही. डोणजे सर्जेमामा यांनी गावाला वेगवेगळ्या विकास कामांसाठी स्वतःची जमीन दान केली आहे. आमदार राहुल दादा कुल यांच्या माध्यमातून या मंदिराच्या सभा मंडपासाठी १० लाख रुपये मिळाले आहेत. मंदिर छोटे असले तरी टुमदार असल्याने भाविकांच्या पसंतीस उतरत आहे.

गट-तट विसरून यात्रा
प्रतिवर्षी चैत्र पंचमीदिवशी म्हसोबा देवाची यात्रा भरते. यावेळी गावातील सर्व ग्रामस्थ गट-तट विसरून कुठेही न फिरता एका जागेवर लोकवर्गणी जमा करतात. विशेष म्हणजे पावती बुक नसून सुद्धा फक्त वहीमध्ये नावे व हिशोब लिहिले जातात. आणि अवघ्या काही तासांमध्ये या देवाच्या यात्रेसाठी पाच लाख रुपये वर्गणी जमते अशी माहिती सरपंच रमेश पासलकर यांनी दिली. देवावरील श्रद्धेपोटी गावातील प्रत्येक ग्रामस्थ वर्गणी देत असल्याचे गलांडवाडी हे वेगळे गाव आहे. याशिवाय हनुमान गणपती, विठ्ठल रुक्मिणी व महादेव मंदिर एकाच छताखाली आणण्याची किमया गलांडवाडी ग्रामस्थांनी साधली आहे. अवघी २ हजार लोकसंख्या असणाऱ्या गलांडवाडीने आतापर्यंत आदर्श सरपंच, पर्यावरण समृद्ध गाव, तंटामुक्ती पुरस्कार मिळवले आहेत.

गावाच्या लोकसंख्येएवढी झाडे
गावाला जोडणाऱ्या रस्त्यावरती दुतर्फा ग्रामस्थांनी गावाच्या लोकसंख्येएवढी झाडे लावली आहेत आणि विशेष म्हणजे संबंधित झाडे जगवली सुद्धा आहेत. गावात ग्रामपंचायतीने हुबेहूब ब्रिटिशकालीन वाटणारे ग्रामपंचायत कार्यालय बांधले आहे. दूध संस्था, सहकारी सोसायटी, पतसंस्था गावच्या विकासात भर घालत आहेत. गावातील निळकंठ बापू शितोळे यांना जिल्हा दूध संघाचे संचालक पद, ज्ञानदेव कदम यांना भीमा पाटस कारखान्याचे संचालक पद, मीनाक्षी भापकर यांना भीमा पाटस कारखान्याचे संचालक पद, उत्तम ताकवले यांना बाजार समितीचे संचालकपद व कै. पोपटराव शिंदे यांना खरेदी विक्री संघाचे चेअरमनपद भूषवण्याची संधी मिळाली. १९६७ मध्ये नव्याने सुरू झालेली ग्रामपंचायत अनेकदा बिनविरोध करण्याचा विक्रम या गावाने केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Drought 2026: महाराष्ट्रात दुष्काळ जाहीर! तुमचा तालुका आहे का चेक करा... जिल्हानिहाय संपूर्ण यादी समोर

वानर थेट वाइन शॉपमध्ये घुसला; दारू प्यायली अन् पुढे जे घडलं ते पाहून लोकंही थक्क

Latest Marathi News Live Update : लालबागच्या राजाचं 24 तासांनंतर विसर्जन, भाविकांचे पाणावले डोळे; समुद्रकिनारी मोठी गर्दी

तेव्हा मी अरिजीतपेक्षा जास्त लोकप्रिय होतो... अभिजीत सावंतचं मोठं विधान; म्हणतो- त्याला कुणी ओळखत नव्हतं

Maharashtra Drought 2026 : राज्यातील २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर; फडणवीस सरकारचा मोठा निर्णय, ट्रिगर-१ लागू झालेल्या तालुक्यांतील शेतकऱ्यांना तातडीने मदत

SCROLL FOR NEXT