पुणे

पिंपळगावतील विषमुक्त गुऱ्हाळास पासवान यांची भेट

CD

खुटबाव, ता. २२ : पिंपळगाव (ता. दौंड) येथील राजेश नातू यांच्या विषमुक्त गुऱ्हाळ घराला बिहारचे ऊस उद्योग विभागाचे कॅबिनेटमंत्री कृष्णनंदन पासवान यांनी नुकतीच अभ्यास दौऱ्यानिमित्त भेट दिली. यावेळी त्यांनी गुऱ्हाळघराची स्वच्छता, दर्जा, गुणवत्तेचे कौतुक केले.
आठवडाभरापासून पासवान महाराष्ट्र राज्याच्या ऊस उत्पादन व ऊस प्रक्रिया उद्योगाच्या अभ्यास दौऱ्यावर आले आहेत. मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे यांच्या निर्देशानुसार नातू यांच्या गुऱ्हाळ घराला भेट दिली. या ठिकाणी गुळांच्यासह पदार्थांची निर्मिती केली जाते. यामध्ये गुळपट्टी, गोडी शेव, गूळ क्यूब, गुळ शेंगदाणा लाडू या विविध गुळाच्या प्रकारचे पदार्थ बनवले जातात.

दौऱ्यामध्ये ऊस उद्योग विभाग बिहार मुख्य सचिव नर्मदेश्वर लालजी, आयुक्त अनिल झा, सहआयुक्त जयप्रकाश नारायण सिंह, वेदब्रतजी, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणेचे डॉ. अशोक कडलग, जालिंदर रायभार यांनी सहभाग घेतला. पिंपळगाव ग्रामस्थांच्या वतीने बापूराव नातू, संतोष नातू, सतीश नातू,राजेश नातू, तेजस नातू, अण्णासाहेब शितोळे,संपत शितोळे,अशोक खोरकर, संभाजी मेमाणे,शांताराम मगर यांनी स्वागत केले.

उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात नंतर बिहारमध्ये शेती स्थिरावू पाहत आहे. बिहारमध्ये मोठ्या प्रमाणात ऊस उत्पादक शेतकरी असून, भविष्यामध्ये मुख्यमंत्री ऊस विकास योजना बिहार राज्यात राबविण्याचा मानस आहे. ऊस उत्पादक व ऊस प्रक्रिया उद्योगांना बळ देण्यासाठी तसेच ऊस पिकांमध्ये अधिक उत्पादन क्षमता वाढवता येण्यासाठी या अभ्यास दौऱ्याचे आयोजन केले आहे.
-रघुनंदन पासवान, कॅबिनेटमंत्री, ऊस उद्योग विभाग, बिहार

01709

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ayodhya Ram Temple Threat : अयोध्येतील राम मंदिर बॉम्बने उडवण्याचा कट? 20 वर्षीय दहशतवादी सुहैलची पोलिसांसमोर धक्कादायक कबुली, 'मेनन अँड जित्तू -333' काय आहे?

Hasan Mushrif Gokul Milk : गोकुळ दूध संघात हसन मुश्रीफांनी ताकद दाखवली, २ हजार ठराव केले दाखल; सगळ्यांना पर्यटनासाठी नेणार, हॉटेल पॉलिटिक्स सुरू

Latest Marathi News Live Update : नसरापूर हत्या-बलात्कार प्रकरण! न्यायालयीन सुनावणीनंतर पोलीस अधीक्षक आणि सरकारी वकिलांची संयुक्त पत्रकार परिषद

Rain Nakshatra : यंदा पाऊस कसा पडणार? नक्षत्र अन् वाहनांवरून मिळाले मोठे संकेत; जाणून घ्या पावसाबाबत काय म्हणते शास्त्र

Wife Privacy Rights : परपुरुषाशी रात्री फोनवर बोलल्याने पत्नी चारित्र्यहीन ठरत नाही, कोर्टाची महत्त्वपूर्ण टिप्पणी

SCROLL FOR NEXT