खुटबाव, ता. १० ः पुणे जिल्ह्यामध्ये भीमा व मुळा- मुठा नदीच्या किनारी असलेल्या विद्युत पंपाच्या चोरीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढले आहे. संबंधित भुरट्या चोरावर अंकुश ठेवण्यासाठी पारगाव (ता. दौंड) येथील शेतकऱ्यांनी चौफेर नजर असणारे सौरऊर्जा संचलित विद्युत कॅमेरे बसवले आहेत. या कॅमेऱ्यांच्या करडी नजरेमुळे वारंवार विद्युत पंप चोरीच्या घटनांना आता चाप बसणार आहे.
विद्युत पंप चोर शोधण्यासाठी येथील शेतकऱ्यांनी सामूहिक पद्धतीने राबविलेला दौंड तालुक्यामध्ये हा पहिलाच आहे. पारगाव येथे सर्वप्रथम सुधीर ताकवणे यांनी परिसरातील १० शेतकऱ्यांना एकत्रित घेऊन हा प्रयोग केला. त्यानंतर योगेश जगताप यांनी नदी किनारी सौर ऊर्जा संचलित कॅमेरे बसविले आहेत. या महिन्यांमध्ये येथील ५० शेतकऱ्यांनी ४ सामूहिक कॅमेरे बसवले आहेत. यासाठी १० हजार इतका खर्च आला आहे. या कॅमेऱ्याचे वैशिष्ट्ये म्हणजे सौरऊर्जेवर चालत असल्याने रात्रीच्या वेळी अंधारात उपयोग होतो. कॅमेरा दिवसा सौरऊर्जेवर रिचार्ज झाल्याने कमीत- कमी १५ ते २० तास चालतो. तसेच एका सोलरवर २ कॅमेरे असतात. त्यापैकी १ कॅमेरा विद्युत पंपाकडे स्थिर केलेला असतो. दुसरा कॅमेरा चोरट्याकडे नजर ठेवण्यासाठी चौफेर फिरत असतो.
सोलर कॅमेरामध्ये उपलब्ध सुविधा
कॅमेऱ्याच्या ५० फूट कक्षेत सजीव प्राणी आल्यास शेतकऱ्यांच्या मोबाईलवर अधिसूचना येते.
मोबाईलमध्ये नोटिफिकेशन क्लिक केल्यावर थेट प्रक्षेपण दिसते.
एखाद्याने कॅमेरा तोडून नेला तरी, त्याचे रेकॉर्डिंग सॉफ्टवेअरमध्ये मिळते
अनोळखी व्यक्ती कॅमेराच्या आसपास आल्यास सायरन वाजतो.
शेतकऱ्याने दिलेल्या सूचनेचा आवाज कॅमेरातून संबंधित अनोळखी व्यक्तीला येतो.
पूर्वी आमच्या परिसरातील विद्युत पंपांच्या वारंवार चोऱ्या होयच्या. उच्चशिक्षित मंदार कोरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली परिसरातील १० शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन सोलर कॅमेरे बसविले. तेव्हापासून आजतागायत एकदाही विद्युत पंप चोरीला गेले नाहीत. सर्व शेतकऱ्यांना विद्युत पंप संरक्षणासाठी सोलर कॅमेरा ही अत्यावश्यक बाब आहे.
- सुधीर ताकवणे, शेतकरी.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.