पुणे

विषमुक्त शेतीतून खळदकर कुटुंबाचे उंचावले अर्थकारण

CD

खुटबाव, ता. १५ : नानगाव (ता. दौंड) येथील उच्च शिक्षित शिवाजी खळदकर यांनी शेती व्यवसाय सांभाळत ४३ मुऱ्हा जातीच्या म्हशींचा वातानुकूलित गोठा तयार केला. म्हशींचे शेण व गोमूत्र एकत्र करण्यासाठी चार लाख रुपये खर्चून ८० हजार लिटर क्षमतेची सिमेंटची टाकी बांधली आहे. त्यातून निर्माण झालेली स्लरी पिकांचे अधिक उत्पादन घेतले. तसेच दुधातून सात लाख ५० हजार रुपये महिन्याला उत्पन्न मिळविले आहे.

खळदकर यांनी टाकीतून शेण व गोमूत्र यांचे संमिश्र द्रावण असणारी स्लरी थेट विविध पिकांपर्यंत पोचवली आहे. याद्वारे खळदकर कुटुंबाने विषमुक्त शेतीचा अभिनव प्रयोग यशस्वी करून दाखविला.

गोठा संगोपनासाठी शिवाजी यांना आई अलका खळदकर, पत्नी नम्रता खळदकर यांची मोलाची मदत मिळत आहे. पत्नी नम्रता या उरुळी कांचन येथील ॲक्सिस बॅंकेमध्ये सहाय्यक व्यवस्थापक आहेत.


म्हशींचे खुराक
१. स्वतःच्या शेतीमध्ये नेपियर गवत
२. ऊस, विकतचे उसाचे वाढे,
३. सरकी, भुसा,
४. गूळ व तेल

दृष्टिक्षेपात
१. हरियाना येथून दोन टप्प्यांमध्ये ६० लाख रुपये किमतीच्या ४३ म्हशी विकत घेतल्या.
२. म्हशींना निवारा म्हणून ८५०० स्क्वेअर फूट आकाराचा अद्ययावत गोठा बांधला.
३. यासाठी ३५ लाख रुपये खर्च केले.
४. सहकारी बँकेकडून भांडवल म्हणून ५० लाख रुपये कर्ज घेतले.
५. परप्रांतीय मजुरांच्या साह्याने आधुनिक पद्धतीने दुग्ध व्यवसाय सुरू केला.


३५० पिशव्या कांदा, ९५ टन सेंद्रिय उसाचे उत्पादन
शिवाजी खळदकर यांच्याकडे साडेसहा एकर जमीन आहे. त्या जमिनीसाठी म्हशींचे शेण व गोमूत्र असणारी शेतीसाठी पौष्टिक स्लरी पाइपद्वारे शेती पिकाच्या पाण्यामध्ये मिसळली जाते. प्रत्येक पिकांच्या मुळापर्यंत पोहोचवली जाते. या उपक्रमाचा फायदा होत खळदकर यांनी चालू वर्षी एकरी ३५० पिशव्या सेंद्रिय कांदा व एकरी ९५ टन सेंद्रिय उसाचे उत्पादन घेतले आहे.

३६० लिटर........दररोज दुधाचे उत्पादन
६८ ते ७० रुपये........... प्रतिलिटर बाजारभाव

प्रत्येक महिन्याचा ताळेबंद
७ लाख ५० हजार रुपये ............सरासरी दूध उत्पन्न
५० हजार रुपये ......... शेणखत विक्री
५ लाख ७५ हजार रुपये ......पशुखाद्य,मजुर, वाढे व औषधे, वाहतूक खर्च
२ लाख २५ हजार रुपये.......सरासरी नफा

दूध व्यवसायासाठी व्यवस्थापन हा महत्त्वाचा विषय आहे. भेसळ विरहित, चांगले व दर्जेदार म्हशीच्या दुधाला चांगली मागणी आहे. भविष्यात दुग्धजन्य पदार्थ निर्मिती करण्याचा विचार आहे. परिसरातील अनेक शेतकऱ्यांना दूध व्यवसायासाठी मार्गदर्शन करणार आहे.
- शिवाजी खळदकर, दूध उत्पादक

02435, 02434

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Election Commission : ‘’राजकीय पक्षांनी वेळीच आक्षेप नोंदवले नाहीत, जर असे घडले असते तर.. ‘' ; निवडणूक आयोगाने स्पष्टचं सांगितल!

Dahi Handi Festival : सरीवर सर! थरावर थर!! राज्यभरात दहीहंडीचा जल्लोष

INDIA Alliance News : 'मतचोरीच्या' विरोधात 'I.N.D.I.A' आघाडीचा 'मतदार हक्क यात्रा'द्वारे बिहारमध्ये एल्गार!

हसत खेळत असलेली बाई अशी... पुर्णा आजीच्या जाण्याचा प्रेक्षकांनाही बसला धक्का; म्हणाले- मन मानायलाच तयार नाही की...

WhatsApp: एक व्हिडिओ कॉल अन् बँक खाते होईल रिकामे; जाणून घ्या कसा होतोय लेटेस्ट फ्रॉड

SCROLL FOR NEXT