पुणे

डॉक्टर मित्रांनी पांडुरंगा चरणी अर्पण केले तन,मन,धन

CD

खुटबाव, ता. १ : पारगाव (ता. दौंड) येथील डॉ. अप्पासाहेब दिवेकर व देलवडी येथील डॉ. सुधीर पवार या डॉक्टर मित्रांनी गेली दोन दशके पांडुरंगा चरणी तन, मन, धन अर्पण केले आहे. या डॉक्टरांनी सलग २० वर्षे आषाढीवारीमध्ये संतराज महाराज पालखी सोहळ्यात १० हजार वारकऱ्यांना मोफत औषधोपचार करण्याचे व्रत अखंडपणे जोपासले आहे.
देलवडी येथील डॉ. पवार यांनी २००२ मध्ये संतराज महाराज देवस्थानचे अध्यक्ष स्वर्गीय सुरेश महाराज साठे व खजिनदार सुदाम कोंडे यांच्याकडे आषाढी वारीत वारकऱ्यांची आरोग्य सेवा करण्यासाठी मागणी केली. देवस्थानने पवार यांच्या मागणीस होकार कळविला.
त्यानंतर पवार यांनी दोन वर्षे दुचाकीवर जाऊन वारीमध्ये संगम येथून पंढरपूरला जाताना पालखीचा मुक्काम असेल त्या ठिकाणी वारकऱ्यांना मोफत औषधोपचार करण्यास सुरुवात केली. त्यानंतर पारगावचे डॉ. दिवेकर यांनी २००५ पासून स्वतःच्या ॲम्बुलन्समध्ये वारकऱ्यांसाठी आरोग्यसेवा देण्यास सुरुवात केली. गेली दोन दशके दोन्हीही डॉक्टर दिवसभर वारकऱ्यांसोबत पायी वारी करतात. रात्री मुक्कामाच्या ठिकाणी ॲम्बुलन्समध्येच फिरता दवाखाना सुरू करतात. संतराज महाराज पालखीतील दररोज सरासरी ५०० वारकरी आरोग्य सुविधा मोफत घेतात. वारकऱ्यांसाठी मोफत इंजेक्शन, गोळ्या, औषधे व वेळ पडल्यास सलाईन भरले जाते. याशिवाय दोन्ही डॉक्टरांच्या वतीने संगम येथील सेवा करणाऱ्या व वीणावादन करणाऱ्या १० कर्मचाऱ्यांचे वर्षभर मोफत औषधोपचार केले जातात. गेल्या १० वर्षांपासून डॉ. दिवेकर यांना पत्नी डॉ. कविता दिवेकर या वारीमध्ये औषधोपचार करण्यासाठी मदत करत आहेत. तसेच रांजणगाव सांडस येथील संतराज महाराज देवस्थानने चालू वर्षी वाखरी येथे वारकऱ्यांच्या वारीतील शेवटच्या मुक्कामासाठी दोन एकर जागा खरेदी केली आहे. यासाठी डॉ. दिवेकर यांनी एक लाख ११ हजार रुपयांचे योगदान दिले आहे. डॉ. पवार यांनी संतराज देवस्थानसाठी यापूर्वी वेळोवेळी आर्थिक देणगी दिली आहे.

आषाढी वारीसाठी डॉ. दिवेकर व डॉ. पवार यांचे योगदान अलौकिक आहे. देवस्थानच्या वतीने त्यांच्या कार्याची दखल म्हणून वार्षिक अहवालात त्यांचा फोटो छापला जातो.सोहळा आरोग्यदायी होण्यासाठी दोघेजण १५ दिवस अहोरात्र निरपेक्षपणे कष्ट करत असतात.
- नामदेव महाराज साठे, सोहळा प्रमुख

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Beed Crime: बीड लैंगिक छळ प्रकरणात आरोपीचे मोबाईल फॉरेन्सिक लॅबला पाठवले; क्लासेसमधील सहकाऱ्यांचेही जबाब नोंदवले

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिलचा भीमपराक्रम! भारताचा 'सर्वोकृष्ट' कसोटी कर्णधार ठरला, विराट कोहलीचा मोडला विक्रम

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिलचे द्विशतक! इंग्लंडमध्ये असा पराक्रम करणारा पहिलाच भारतीय कर्णधार, मोडले अनेक विक्रम

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिलसमोर इंग्लंडने गुडघे टेकले! गावस्करांचा ४६ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला, जगात भारी ६ पराक्रमही केले

Latest Maharashtra News Updates : बालेवाडीत कार्यालयातून १९ लाखांचे विदेशी चलन लंपास

SCROLL FOR NEXT