पुणे

शिक्षकाकडून विद्यार्थ्यांसाठी सर्वस्व अर्पण

CD

प्रकाश शेलार : सकाळ वृत्तसेवा
खुटबाव, ता. ९ : खामगाव (ता. दौंड) येथील राष्ट्रीय शिक्षक पारितोषिक विजेत्या कैलास गुंजाळ या गुरुवर्य शिक्षकाने विद्यार्थ्यांसाठी सर्वस्व अर्पण केले आहे. त्यांनी आयुष्यभर एकच ध्यास शाळा, शिष्यांचा विकास हे व्रत अंगीकारले आहे. गुंजाळ यांनी लोकसहभागातून खेडेकर वस्ती, साळोबावस्ती व इनामदार वस्ती शाळेचा चेहरामोहरा बदलला आहे.


शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या गुंजाळ यांनी बदली होऊन ज्या शाळेमध्ये जाईल त्या शाळेतील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासावर भर दिला आहे. आजही विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता जोपासताना दर्जेदार अध्यापन करत त्या शाळेमध्ये आचारी, गवंडी, बिगारी आदी कामे ते निसंकोचपणे करतात. गुंजाळ यांना २०१४ मध्ये माजी राष्ट्रपती स्वर्गीय प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला. पुरस्कारातून मिळालेली बक्षीस स्वरूपातील ५० हजार रुपयाच्या रकमेमध्ये गुंजाळ यांनी खिशातील भर टाकत खेडेकरवस्ती (तालुका दौंड) शाळेला स्वखर्चाने रंगरंगोटी केली. साळोबा वस्ती (तालुका दौंड) शाळेमध्ये असताना २०१८ पासून २०२३ पर्यंत प्रत्येक वाढदिवसाला गुंजाळ यांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यवाटप व वृक्षारोपण केले आहे. इनामदार वस्ती (ता.हवेली) येथील जिल्हा परिषद शाळा बांधकामासाठी त्यांनी २१ हजार रुपयांची देणगी दिली आहे.

खेडेकर वस्ती शाळेमध्ये नोकरीला असताना गुंजाळ वर्षभरातून ३६५ दिवस शाळा भरवली. येथील कामाचे बक्षीस म्हणून गुंजाळ यांना राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार व सहकारी शिक्षक बळीराम सरपणे यांना राज्य शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला आहे. गुंजाळ यांच्या प्रयत्नातून खेडेकर वस्ती शाळेतील ५ विद्यार्थी शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत आले. शाळेमध्ये लोकसहभाग वाढवा म्हणून खेडेकर वस्तीच्या शाळेसाठी रोटरी क्लब ऑफ पुणे शिवाजीनगर माध्यमातून साडेतीन लाखांची शैक्षणिक साहित्य मिळवले. स्वतः दारोदार फिरत ग्रामस्थांकडून १० लाख रुपये लोकवर्गणी जमा केली व शाळेच्या भौतिक सुविधांमध्ये भर घातली. सर्व शिक्षा अभियानातून शाळा दुरुस्तीसाठी निधी मिळवला. फिल्डगार्ड कंपनीच्या माध्यमातून खेडेकर वस्ती शाळेला ५ लाख रुपये किंमतीचे स्वच्छतागृह, साळोबा वस्ती शाळेला ३ लाख रुपये किमंतीचा शुद्ध पाणी पिण्याचा प्रकल्प व अडीच लाख रुपयांची खेळणी मिळवून दिली. खेडेकरवस्ती येथे असताना ही शाळा तालुक्यातील पहिली आयएसओ शाळा केली.
स्वतःच्या हाताने शाळेचे बोलके व्हरांडे, सुशोभीकरण, बाग बगीचा सजावट केली. साळोबावस्ती शाळेला विटगण कंपनीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना बसण्यासाठी ५० बाक, साडेचार लाख रुपयांचे स्वच्छतागृह उभारले. नुकतेच इनामदार वस्ती जिल्हा परिषद शाळेचे काम नुकतेच पूर्ण झाले आहे. या शाळेचे बांधकाम चालू असताना गुंजाळ यांनी सलग सात महिने स्वतःच्या हाताने इमारतीच्या कच्च्या बांधकामाला पाणी मारले.

मोदींसोबत डिनर व राष्ट्रपतींकडून पुरस्कार
स्वर्गीय राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते २०१५ मध्ये पुरस्कार मिळाला. त्यानंतर नरेंद्र मोदी व माजी मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांच्यासोबत डिनर करण्याची संधी मिळाली. हा माझ्यासारख्या शेतकरी कुटुंबातील प्रथमच दिल्ली पाहिलेल्या शिक्षकासाठी अविस्मरणीय क्षण होता, असे मत कैलास गुंजाळ यांनी व्यक्त केले.

भविष्यामध्ये शिक्षणापासून वंचित विद्यार्थ्यांना शिक्षण प्रवाहात आणण्याचा विचार आहे. इंग्रजी माध्यमाच्या शाळांशी स्पर्धा करण्यासाठी जिल्हा परिषद शाळा सज्ज करण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे. सेवानिवृत्तीनंतरही अध्यापनाचे काम कायम चालू ठेवणार आहे. गुरुपौर्णिमेनिमित्त माझ्या बंधू - भगिनींना शुभेच्छा!
- कैलास गुंजाळ, राष्ट्रीय पुरस्कार विजेते शिक्षक

02631

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganpati Visarjan 2025 Live Updates : लालबागच्या राजाचं विसर्जन अंतिम टप्प्यात; पाहा थेट प्रक्षेपण

Video: अक्षय कुमार आणि अमृता फडणवीस गणेशोत्सवानंतर स्वच्छता मोहिमेत सहभागी, समुद्रकिनाऱ्याची केली साफसफाई

लालबागच्या राजाचं विसर्जन कसं करायचं? गुजरातहून खास अत्याधुनिक तराफा आणला, पण मूर्ती चढवण्यात अडचणी

US Open जिंकल्यानंतर सबलेंका पत्रकार परिषदेत थेट शॅम्पेनची बॉटलच घेऊन आली, काय म्हणाली पाहा Video

Sindhudurg Railway : सिंधुदुर्गात रेल्वे स्थानके तुडुंब, परतीचा प्रवास; वाहतूकीचे वेळापत्रक कोलमडले, चाकरमान्यांचे हाल

SCROLL FOR NEXT