पुणे

दौंड तालुका शिष्यवृत्तीत काठावर

CD

खुटबाव, ता. १५ : पुणे जिल्ह्यातील अनेक तालुक्यांचा शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल समाधानकारक लागला असताना दौंड तालुका मात्र या परीक्षेमध्ये काठावर पास ठरल्याचे चित्र आहे. यावर्षी दौंड तालुक्यात पाचवीचे १५ तर आठवीचे २१ विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले आहेत.
तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल पारगाव येथील पाच विद्यार्थी व जिल्हा परिषद शाळा गलांडवाडी येथील सहा विद्यार्थी गुणवत्ता यादीत आल्याने या शाळांचे अभिनंदन होत आहे. याशिवाय तालुक्यातील काही शाळांमध्ये एखादा दुसरा विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले आहेत. परंतु, अनेक शाळांतील विद्यार्थी गुणवत्ता यादी तर दूरच परंतु शिष्यवृत्ती परीक्षा उत्तीर्ण न झाल्याचे चित्र आहे. यावर्षी पाचवी शिष्यवृत्तीसाठी तालुक्यातील १४९ शाळांनी सहभाग घेतला. प्रत्यक्ष परीक्षेत ३०३० विद्यार्थी बसले त्यापैकी ४१४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले व १५ विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले. तसेच या परीक्षेला ८७ विद्यार्थी गैरहजर राहिले. म्हणजेच २५२९ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. चालू वर्षी पाचवीचा शिष्यवृत्तीचा निकाल १४.०६ टक्के लागला आहे. आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत तालुक्यातील ९० शाळांनी सहभाग घेतला. या परीक्षेसाठी १७८७ विद्यार्थी बसले. त्यापैकी १७१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये २१ विद्यार्थी गुणवत्ता यादीमध्ये आले. तसेच ४० विद्यार्थी परीक्षेला गैरहजर राहिले. १५७६ विद्यार्थी या परीक्षेत अनुत्तीर्ण झाले. म्हणजेच आठवीचा शिष्यवृत्तीचा निकाल ९.७८ टक्के लागला आहे.

चालू वर्षी अनेक शाळांमध्ये शिष्यवृत्तीसाठी वेगवेगळे उपक्रम राबविण्यात आले. याचाच परिपाक म्हणून गुणवत्ता यादीतील विद्यार्थी संख्या वाढली आहे. तालुका सध्या स्थित्यंतराच्या काळातून जात असून भविष्यात शिष्यवृत्तीचा निकाल परिणामकारक असेल. न्यू इंग्लिश स्कूल पारगाव व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गलांडवाडी या शाळेतील शिक्षकांचे व विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन!
- संजय महाजन, गटशिक्षणाधिकारी, दौंड.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 POINT TABLE: चुका करूनही चेन्नई सुपर किंग्स जिंकले! कोलकाता नाइट रायडर्सची विजयाची पाटी कोरीच, मुंबई इंडियन्सला धक्का...

Startup Success : दोनदा नोकरीवरून काढलं… त्यानंतर त्याने असं काही केलं की महिन्याला कमावतो १.३ कोटी

Dhurandhar 2 Movie : धुरंधर चित्रपट शृंखलेचा नवा विक्रम; ३००० कोटींची कमाई करणारी पहिली भारतीय फिल्म सिरीज

IPL चे सामने ऑस्ट्रेलियात अन् BBL ची मॅच चेन्नईत! क्रिकेट चाहत्यांसाठी खूप मोठी बातमी; पडद्यामागे बऱ्याच हालचाली, BCCI...

Babasaheb Ambedkar Jayanti : भीमसागर नतमस्तक! अभिवादनासाठी हजारो अनुयायांची गर्दी

SCROLL FOR NEXT