पुणे

खुटबावला लोकवर्गणीतून साकारले हनुमान मंदिर

CD

खुटबाव, ता. १५ : खुटबाव (ता. दौंड) या गावातील १००० कुटुंबांनी आपापला खारीचा वाटा उचलत ५७ लाख रुपये लोकवर्गणीच्या माध्यमातून हेमाडपंथी आकाराचे हनुमान मंदिर साकारले आहे. रविवारी (ता. १३) मंदिरामध्ये हनुमानाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. ८१ हजार रुपये किमतीची ही मूर्ती काळ्या पाषाणात बनवली असून पंढरपूर (जि. सोलापूर) येथून आणण्यात आली आहे. आकर्षक आणि टुमदार मंदिरामुळे गावच्या वैभवामध्ये भर पडली आहे.
एक वर्षापूर्वी गावातील जुन्या हनुमान मंदिराच्या बाजूला नवीन हेमाडपंथी मंदिर बांधण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला. यासाठी लोकवर्गणी करण्याचा निर्णय घेतला. या मंदिरासाठी ५७ लाख रुपये खर्च झाला आहे. यामध्ये ३० लाख रुपये लोकवर्गणी, २५ लाख रुपये जिल्हा परिषद बांधकाम विभागाचा निधी आणि शिरूर येथील उद्योजक प्रकाश धारिवाल यांच्या वतीने मंदिराच्या फरशीसाठी दोन लाख २१ हजार रुपये देण्यात आले आहेत. शिल्पकार हनुमंत बांगणे यांनी मंदिराचे बांधकाम केले आहे. आकर्षक कमान, सुंदर कलाकुसर, त्यावर रामायणातील रेखाचित्रे रेखाटली आहेत. मंदिराच्या पार्श्‍वभागावर हत्ती, घोडे यांची सुबक शिल्पे साकारली आहेत.
यावेळी निवृत्ती महाराज इंदुरीकर म्हणाले, ‘‘माजी आमदार रमेश थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली खुटबाव सलग ५० वर्षे बिनविरोध होत आहे. बिनविरोध निवडणुकीमुळे एकोपा राहून त्यामुळे गावचा विकास झाला आहे. कार्यक्रमानिमित्त गावातून सवाद्य हनुमानाची मिरवणूक काढण्यात आली. त्यामध्ये संपूर्ण गाव सहभागी झाले होते. महिलांनी डोक्यावर पाण्याच्या हंडा घेत, फुगडी खेळत, फेर धरत मिरवणुकीत आनंदोत्सव साजरा केला. २१ जोडप्यांच्या हस्ते होमहवन करण्यात आले. त्यानंतर ग्रामस्थांना महाप्रसाद देण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

प्रसिद्ध अभिनेत्याचं वयाच्या 40 व्या वर्षी निधन; कॅन्सरशी झुंज ठरली अपयशी

America-Israel War: आता लास्ट.. बुधवारपर्यंत ऐकलं नाही तर...; ट्रम्प यांचा इराणला आणखी एक अल्टिमेटम

Latest Marathi News Live Update: अमरावतीत न्यायालयासमोर वकिलाला महिलांकडून मारहाण

केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी, महागाई भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय

Sangli Politics : सांगली महापालिकेत भाजप-काँग्रेसचं धक्कातंत्र! पराभूत उमेदवारांना दिली संधी, निष्ठावंतांचा पत्ता केला कट, यादीत अनेक अनपेक्षित नावे

SCROLL FOR NEXT