खुटबाव, ता. २६ : उत्तरेला मुळामुठा, भीमा नदीचे महाकाय खोरे, त्यालाच समांतर दक्षिणेला पुणे-सोलापूर महामार्ग, मध्यभागी पुणे-सोलापूर रेल्वे मार्ग, या तिन्हींना मधोमध छेदणारा शिरूर-सातारा, राष्ट्रीय महामार्ग या तिघांमध्ये हिरव्यागार शेतीचा शालू पांघरलेला, विपुल निसर्ग संपदा लाभलेला दौंड तालुका आहे.
हा तालुका पुणे शहर, इतर भागातील पर्यटकांना आकर्षित करू पाहत आहे. अलीकडील १० वर्षांमध्ये दौंडच्या पश्चिम भागामध्ये पुणेकरांना आकर्षित करण्यासाठी ७ खासगी कृषी पर्यटन केंद्रे शेतीमध्ये साकारण्यात आली. सध्या पर्यटक या केंद्रांना भेटी देत आहेत. याशिवाय दौंडमधील महत्त्वाची तीर्थस्थळे, ऐतिहासिक स्थळे आणि सामाजिक स्थळे पर्यटकांना खुणावत आहेत. राज्यातील मोरगाव, सिद्धटेक, रांजणगाव गणपती, थेऊर या अष्टविनायकांपैकी असणाऱ्या ४ गणपती देवस्थानचा अष्टविनायक मार्ग दौंड तालुक्यातून जातो. त्यामुळे दळणवळणाच्या सुविधा वाढल्या आहेत.
कसे पोहोचाल-
- स्वारगेट पासून दर १० मिनिटाला दौंड तालुक्यातून जाणारी पुणे-सोलापूर महामार्गावर एसटी असते.
- हडपसर ते वरवंड तसेच पुणे स्टेशन ते पारगाव पीएमपी सुविधा.
- दररोज पुणे स्टेशन वरून दौंडकडे ये-जा करणाऱ्या डेमू आणि पॅसेंजर रेल्वे गाड्यांनीही येथे पोहोचू शकते.
राहण्याची व जेवणाची सुविधा
पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर व शिरूर-सातारा राष्ट्रीय महामार्गावर मुक्कामासाठी ५० हून अधिक लॉज आहेत. तसेच तालुक्यातील काही धार्मिक ठिकाणी भक्त निवास बांधण्यात आले. जेवणासाठी यवत, चौफुला, पाटस, केडगाव परिसरामध्ये प्रसिद्ध शाकाहारी, मांसाहारी हॉटेल आहेत. दौंडच्या पूर्व भागातील काही हॉटेलमध्ये उजनी धरणातील मासे खाण्यासाठी मिळतात.
काय पहाल
- बोरमलनाथ मंदिर चौफुला
- फिरंगाई देवी कुरकुंभ
- विठ्ठल रुक्मिणी मंदिर दौंड
- नारायण महाराज बेट देऊळगाव गाडा
- प्रति पंढरपूर डाळिंब बन
- प्रति जेजुरी देलवडी
- मुळा मुठा व भीमा नदीचा संगम असणारे तीर्थक्षेत्र संगम
- कुसेगाव येथील भानोबा मंदिर
- स्वामी चिंचोली येथील पेशवेकालीन राम मंदिर
तालुक्यातील प्रमुख पर्यटन स्थळे
- ब्रिटिशकालीन माटोबा तलाव नाथाची वाडी
- पेशवेकालीन मस्तानी तलाव व मस्तानी बारव पाटस
- ब्रिटिश कालीन व्हिक्टोरिया तलाव वरवंड
- दौंड येथील ब्रिटिश कालीन रेल्वे जंक्शन, रेल्वे पूल व चर्च
तालुक्यातील ऐतिहासिक स्थळे
- पेडगाव येथील बहादूरगड किल्ला
- मलठण येथील दादोजी कोंडदेव यांच्या पूर्वजांचा वाडा
- देऊळगाव राजे येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांची घरे व शेती
- केडगाव येथील रमाबाई मुक्ती मिशन
कृषी पर्यटन
- यवत २४ भांडगाव
- थोरात फार्म खुटबाव
- मुलूख फार्म ऍग्रो टुरिझम दहिटणे
- मेहेर रिट्रीट खुटबाव
- पवार ऍग्रो टुरिझम नांदूर
- शेरू ऍग्रो टुरिझम यवत
- दरेकर वाडा ॲग्रो टुरिझम केडगाव
फळबागा, फुलबागांसाठी दौंड प्रसिद्ध
दौंड तालुक्यामध्ये राहू बेटातील डाळिंब शेती, यवत वाखारी
परिसरातील फूल शेती, खोर येथील अंजिराच्या फळबागा, एकेरीवाडी येथील तरकारी शेती, कानगाव, वरवंड, पारगाव पट्ट्यातील कांदा शेती, दौंडच्या पूर्व भागातील कापूस शेती तालुक्याबाहेरील शेतकऱ्यांना अभ्यास शेती करण्यासाठी महत्त्वाची आहे.
दौंड तालुका निसर्गाचे वरदान लाभलेला तालुका आहे. जिल्ह्यातील सर्वाधिक बागायती तालुका म्हणून या तालुक्याकडे पाहिले जाते. तालुक्यातील अनेक पर्यटन स्थळे, ऐतिहासिक स्थळे व तीर्थस्थळे पर्यटकांना खुणावत आहेत.
संजय जाधव, ग्रामस्थ, वरवंड
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.