पुणे

तांबेवाडीत २५० कुटुंबांना डिजिटल रेशनकार्ड वाटप

CD

खुटबाव, ता. १३ : खामगाव (ता . दौंड) परिसरातील तांबेवाडी येथे २५० कुटुंबांना डिजिटल रेशनकार्डचे वाटप करण्यात आले. माजी उपसरपंच सुखदेव चोरमले यांच्या संकल्पनेतून यवत मंडलाधिकारी कार्यालयाच्या वतीने हा उपक्रम राबवण्यात आला.
गावातील ग्रामस्थांच्या वर्षानुवर्षे रेशनकार्ड बाबत अनेक तक्रारी होत्या. यामध्ये रेशनकार्डवर धान्य न मिळणे, विभक्त झालेल्या कुटुंबाचे रेशन कार्ड विभक्त न होणे, दुबार ज झालेले रेशन कार्ड या अडचणींचा समावेश होता. ग्रामस्थांच्या मागणीनुसार चोरमले यांनी यांनी स्वखर्चातून डिजिटल रेशन कार्ड करण्यासाठी शिबिर घेतले. या शिबिराला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला.
यावेळी सुखदेव चोरमले म्हणाले की, ‘‘स्थानिक ग्रामस्थांची वर्षानुवर्षे रेशनकार्डची समस्या होती. यासाठी आमदार राहुल कुल यांच्याकडे पाठपुरावा केला. एक दिवस झालेल्या शिबिरामध्ये ३०० पैकी २५० कुटुंबांना डिजिटल रेशनकार्ड देण्यात आले.’’
ग्रामस्थ शांताबाई पिंगळे म्हणाल्या की, ‘‘गेली पाच वर्षापासून मला रेशन कार्डचे धान्य मिळत नव्हते. यासंदर्भात सुखदेव चोरमले यांच्याकडे पाठपुरावा केला. अवघ्या दोन दिवसांत शिबिर घेण्यात आले. डिजिटल रेशनिंग कार्ड मिळत असल्याचा आनंद आहे.’’

3008

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT