जनतेचा विश्वास- विकासाचा संकल्प
निराणी ग्रुपच्या माध्यमातून अनेक तालुक्यांना पाहता आले, परंतु आमदार राहुलदादा कुल यांच्यासारखे विकासाभिमुख नेतृत्व आदर्श वाटते. दादांची व माझी सर्वप्रथम ओळख पाच वर्षांपूर्वी झाली. अतिशय प्रगल्भ, हुशार, तालुक्यातील सर्व प्रश्नांची तळमळ असणारे हे व्यक्तिमत्त्व आहे. प्रतिकूल परिस्थितीमध्ये तालुक्यातील अनेक विकास कामे ते पुढे घेऊन जात आहेत. तालुक्याची घडी बसविताना भीम पाटस कारखाना नव्याने चालू केला, हे त्यांचे सर्वोत्तम यश आहे.
- रविकांत पाटील,
कार्यकारी संचालक, भीमा पाटस साखर कारखाना
दौंड तालुक्याच्या सर्वांगीण विकासाच्या प्रगतीची झेप ज्यांच्या कर्तृत्वामधून भरारी घेत आहे, असे तमाम जनतेचा विश्वास आणि विकासाचा संकल्प म्हणजे आमदार राहुलदादा कुल! लोकांशी थेट संवाद ठेवणारा, विकासाची गती वाढवणारा आणि सर्वसामान्यांचा प्रतिनिधी, अशी त्यांची प्रतिमा निर्माण झाली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली गेल्या काही वर्षांत दौंड तालुक्याचा चेहरा अक्षरशः बदलू लागला आहे. रस्ते, शेती, पाणीपुरवठा, आरोग्य, शिक्षण, ग्रामविकास आणि तरुणांसाठी रोजगारनिर्मिती या सर्वच क्षेत्रात त्यांनी नवा अध्याय लिहिला आहे.
दौंड तालुका प्रामुख्याने कृषिप्रधान आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी आणि गरजा समजून घेत आमदार राहुलदादा कुल यांनी पहिल्यापासूनच शेती विकासावर भर दिला. मुळशी धरणाचे पाणी पुणे जिल्ह्याच्या पूर्वेकडे वळविण्याचा निर्णय ही त्यांच्या प्रयत्नांची मोठी फळे आहेत. या निर्णयामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना पिकांसाठी कायमस्वरूपी पाण्याचा आधार मिळणार आहे. बंदिस्त पाइपलाइन योजना, जनाई पाणी योजनेचा विस्तार, तसेच पुरंदर पाणी योजना यासाठी त्यांनी राज्य शासन आणि संबंधित विभागात सातत्याने पाठपुरावा केला. याचबरोबर, शेतकऱ्यांसाठी सिंचनाच्या सुविधा वाढविणे, नाल्यांचे जाळे सुधारित करणे आणि जलसंधारणाच्या उपाययोजनांना गती देण्यात आली. याचा थेट परिणाम म्हणजे शेतकऱ्यांच्या उत्पादनक्षमतेत वाढ, तर पिकांना योग्य वेळी पाणी उपलब्ध झाल्याने उत्पन्नातही चांगली भर पडली.
रस्ता विकासाला प्राधान्य
कोणत्याही तालुक्याच्या विकासात रस्त्यांचे जाळे ही मूलभूत गरज असते, हे ओळखून राहुलदादांनी रस्ता विकासाला प्राधान्य दिले. तालुक्यातील अनेक प्रमुख मार्गांचे रुंदीकरण, डांबरीकरण आणि दुरुस्तीची कामे करण्यात आली. पाटस- दौंड मार्ग, वरवंड- यवत, खडकी- बोरीपार्धी, केडगाव अशा मोठ्या बाजारपेठेमधील गावचे अंतर्गत रस्ते नव्या रूपात उभे राहिले आहेत. त्यामुळे शेतमाल बाजारात पोहोचविणे सुलभ झाले. तसेच, नागरिकांच्या रोजच्या प्रवासातही सुरक्षितता आणि सोय निर्माण झाली. अनेक ग्रामीण भागातील रस्त्यांची स्थिती सुधारल्याने गावोगाव विकासाची चाके फिरू लागली आहेत. दुर्गम भागातूनही नागरिकांना शहरात पोहोचणे सोपे झाले असून ग्रामीण- शहरी दरी कमी होण्यास मदत झाली आहे.
आरोग्य सेवेत मोठी सुधारणा
आरोग्य हे समाजाच्या प्रगतीचे महत्त्वाचे साधन आहे. दौंड तालुक्यात आरोग्य सेवेत मोठी सुधारणा घडवून आणण्यात आली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे, ग्रामीण रुग्णालयात नव्या सेवांचा समावेश करणे, औषधोपचार सुलभ करणे, अशा अनेक पावले उचलली गेली. कोविड काळात नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचविण्यातही राहुलदादा कुल यांनी नेतृत्वाची भूमिका निभावली. त्याचबरोबर, आरोग्य जनजागृतीसाठी नियमित आरोग्य शिबिरे, रक्तदान शिबिरे आणि महिलांच्या आरोग्यासाठी विशेष उपक्रम राबविले गेले. नागरिकांना गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा मिळावी, हा त्यांच्या कारभाराचा पाया राहिला आहे.
ग्रामविकास प्रत्यक्षात
तरुण पिढी सक्षम झाल्याशिवाय कोणताही भाग प्रगती करू शकत नाही, हे राहुलदादा कुल यांनी ओळखले आहे. त्यामुळे शैक्षणिक सुविधांचा दर्जा वाढविण्यासाठी त्यांनी विशेष भर दिला आहे. शाळांमध्ये डिजिटल साधनांचा वापर, स्मार्ट क्लासरूमची स्थापना, ग्रामीण भागात वाचनालयांची उभारणी, तसेच विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन शिबिरे आयोजित करण्यात आली. त्याचबरोबर, तरुणांना
रोजगारासाठी तयार करण्यासाठी कौशल्य विकास कार्यक्रम, औद्योगिक प्रशिक्षण संधी आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र उभारण्यात आले. त्यामुळे ग्रामीण भागातील तरुणांना शहरात न जाता स्वतःच्या भागात संधी निर्माण करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ग्रामपंचायतींना सक्षम करणे, पाणी, वीज, स्वच्छता, रस्ते, पथदिवे, सिमेंट काँक्रिट रस्ते आणि नालेबंदी यावर मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यामुळे तालुक्यातील अनेक गावांचा चेहरा बदलला आहे. विकासकामे फक्त शहरापुरती मर्यादित न ठेवता ती गावागावात पोहोचविण्याचा ध्यास त्यांनी घेतला आहे. यासोबतच, महिलांसाठी बचतगट योजनांना चालना, स्वच्छ भारत मिशनअंतर्गत स्वच्छता उपक्रम, तसेच जलसंधारण व हरित ग्राम योजना यावरही भर देण्यात आला आहे. त्यामुळे ग्रामविकास केवळ कागदावर नाही तर प्रत्यक्षात लोकांना जाणवू लागला आहे.
भविष्यातील प्रगतीचा नवा अध्याय
राहुलदादा कुल यांनी विकासात पर्यावरणाचा समतोल राखणेही महत्त्वाचे मानले आहे. वृक्षारोपण मोहिमा, जलसंधारणाचे प्रकल्प आणि प्लास्टिकमुक्त गाव उपक्रम राबवून त्यांनी हरित दौंड निर्माण करण्याचा संकल्प केला आहे. नागरिकांच्या सक्रिय सहभागामुळे अनेक गावांनी पर्यावरणपूरक उपक्रमात आघाडी घेतली आहे. आमदार राहुलदादा कुल यांचा कार्यकाल हा ‘विकास, विश्वास आणि संवाद’ या तिन्ही आधारांवर उभा आहे. ते नेहमी लोकांमध्ये राहून त्यांच्या समस्या ऐकतात, त्यावर तत्काळ उपाय शोधतात. कार्यक्रम, सभा, ग्रामदर्शन, कार्यालयात होणाऱ्या भेटी अशा विविध माध्यमांतून त्यांनी जनतेशी थेट संवाद टिकवून ठेवला आहे.
दौंड तालुक्याचा विकास हे फक्त शब्द नाहीत, ते प्रत्यक्षात घडवून दाखविण्याचे काम आमदार राहुलदादा कुल यांनी केले आहे. त्यांचा वाढदिवस हा केवळ एक औपचारिक सोहळा नसून, तो जनतेच्या विश्वासाचा, विकासाच्या वचनपूर्तीचा आणि भविष्यातील प्रगतीच्या नव्या अध्यायाचा आरंभ ठरत आहे.
(शब्दांकन- प्रकाश शेलार)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.