पुणे

रस्त्यावर साचलेल्या पाण्याचे जलपूजन

CD

खुटबाव, ता. ३ : पारगाव (ता. दौड) येथील पारगाव- राहू रस्त्यावर पावसाच्या पाण्यामुळे दोन ते तीन फूट खोलीचे आणि जवळपास १५० ते २०० फूट लांबीचे पाण्याचे तळे तयार झाले आहे. या तळ्यामुळे अनेक प्रवाशांची गैरसोय होत आहे. प्रशासन यावर दखल घेत नसल्याने ग्रामस्थांनी निषेध म्हणून गांधीगिरी पद्धतीने या तळ्यातील पाण्याचे जलपूजन केले.
हा रस्ता मुख्य बाजारपेठेचा असल्याने नजीकच्या सर्व दुकानदारांना आणि ग्रामस्थांना याचा मनस्ताप सहन करावा लागत आहे. या साचणाऱ्या पाण्याबाबत पारगाव ग्रामस्थांनी अनेकदा प्रशासनाकडे तक्रारी दाखल केल्या आहेत. मात्र, त्याचा कोणताही परिणाम प्रशासनावर झालेला नाही. त्यामुळे त्रस्त झालेल्या पारगाव ग्रामस्थांनी प्रशासनाचा निषेध नोंदविण्यासाठी या साठलेल्या पाण्यात उतरून जलपूजन करत अनोखे आंदोलन केले आहे. यावेळी आंदोलनकर्ते विजय चव्हाण, सोमनाथ ताकवणे, दत्तात्रेय आल्हाट, सुरेश ताकवणे, सर्जेराव भोसले, दादा अडसूळ आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी असणारे जुने नैसर्गिक स्रोतच बंद झाल्याने दरवर्षी या रस्त्यावर पाणी साचत आहे. साचलेल्या पाण्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यावर खड्डे पडले आहेत. या पाण्यातून ये- जा करताना खड्ड्यांचा अंदाज न आल्याने अनेक दुचाकीस्वार पडून जखमी झाले आहेत. अनेकदा चारचाकी गाड्याही या पाण्यात बंद पडल्या आहेत. याच रस्त्याने शेकडो शाळकरी मुले- मुली सायकलवरून ये- जा करत असतात. साचलेल्या पाण्यातून या सर्व विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून मार्ग काढावा लागतो. तसेच, पायी चालत जाण्यासाठी रस्ताच नसल्याने महिला वर्गाची प्रचंड कुचंबणा होत आहे.
याबाबत आंदोलक विजय चव्हाण म्हणाले की, ‘‘पारगाव येथील मुख्य रस्त्यावर हा प्रश्न कायमस्वरूपी भेडसावत आहे. प्रशासनाने सहनशीलतेचा अंत न पाहता योग्य ती कारवाई येत्या आठवड्यात करावी. अन्यथा तीव्र स्वरूपाचे ‌आंदोलन छेडले जाईल.’’

या समस्येसंदर्भात प्रशासनाशी तीन वेळा पत्रव्यवहार करून, प्रत्यक्ष भेटही घेतली आहे. तरीही त्याची कोणतीही दखल संबंधित विभागाने घेतलेली नाही. स्थानिक दुकानदारांनी व जमीनदारांनी वर्षानुवर्षे चालत असणारे पाण्याचे स्रोत बंद केल्याने पाण्याचे कृत्रिम तळे साचत आहे. प्रशासनाने आठवडाभरात दखल न घेतल्यास ग्रामस्थांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन करणार आहे.
- सुभाष बोत्रे, सरपंच

03041

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bhin Yojana : लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी ! आजपासून खात्यात जमा होणार 'इतके' पैसे

Sushma Andhare: फलटण महिला डॉक्‍टर आत्‍महत्‍याप्रकरणी चौकशीसाठी उच्‍चस्‍तरीय समिती नेमा: सुषमा अंधारे आक्रमक; पोलिस ठाण्‍यासमोर ठिय्‍या..

Morning Breakfast Recipe: सकाळच्या नाश्त्यात झटपट बनवा न तळता आख्या हिरव्या मुगाचे वडे, लगेच लिहून घ्या रेसिपी

Ranajitsinh Nimbalkar: मी नार्को टेस्टला तयार: रणजितसिंह नाईक-निंबाळकर; बदनामीमागे रामराजेच मास्टरमाइंड; स्क्रीनवर नेमकं काय दाखवलं?

सोलापूर शहर पोलिसांचा मोठा निर्णय! चोरट्यांना शहरात येता येणार नाही, आले तर बाहेर जाता येणार नाही; शहरात आता रात्री २१ ठिकाणी ‘सरप्राईज’ नाकाबंदी

SCROLL FOR NEXT