पुणे

भांडगावात नवकल्पनांचा ‘गूळ’ निखळ गोड!

CD

प्रकाश शेलार ः सकाळ वृत्तसेवा
खुटबाव, ता. २० : भांडगाव (ता. दौंड) येथील नववी शिकलेल्या बळवंत दोरगे या युवकाने एक कोटी १५ लाख रुपये खर्चून स्वतःच्या संकल्पनेतून भांडगाव येथे पुणे- सोलापूर महामार्गाच्या कडेला संपूर्ण स्टीलचे कोटिंग असणारे बंदिस्त, हायजेनिक, स्वयंचलित, रसायन व प्रदूषण विरहित व सेंद्रिय गुऱ्हाळघर साकारले आहे.
पुणे जिल्ह्यामध्ये दोरगे यांचा चारही बाजूने बंदिस्त गुऱ्हाळ घराचा हा पहिलाच प्रयोग आहे. दररोज २५ टन ऊस गाळप करण्याची क्षमता आहे. हे गुऱ्हाळ पाहण्यासाठी अनेक शेतकरी दररोज भेटी देत आहेत. यासाठी दोरगे यांनी स्वतःचे तंत्रज्ञान वापरले आहे. यापूर्वी त्यांनी स्वतःच्या अनुभवाच्या जोरावर महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेर १५० अत्याधुनिक गुऱ्हाळघरे तयार केली आहेत. या अनुभवाचा दोरगे यांना फायदा झाला असून, त्यांनी स्वतःचे दर्जेदार व प्रदूषण विरहित गुऱ्हाळ बनविण्याचा निर्णय घेतला.
याबाबत दोरगे यांनी सांगितले की, ‘‘सहा महिन्यापूर्वी गुऱ्हाळाचे काम सुरू केले. बंधू ज्ञानेश्वर दोरगे, मेहुणे दीपक शिंदे, पांडुरंग दोरगे, सुजाता दोरगे व सुवर्णा दोरगे यांच्या मदतीने गुऱ्हाळ बांधले आहे. स्वच्छतेच्या दृष्टीने ३१८ एसएस स्टीलचा वापर केला आहे. स्वयंचलित असल्याने या गुऱ्हाळामध्ये फक्त सात कामगारांची आवश्यकता आहे. या निर्णयामुळे पैसा व वेळेची बचत होणार आहे. उसाची ट्रॉली गुऱ्हाळाच्या शेजारी लावल्यानंतर ऊस आपोआप स्वयंचलित यंत्रणेद्वारे गाळपासाठी जातो. त्यानंतर क्रेशरद्वारे ऊस गाळला जातो. वेस्टेज झालेला बग्यास ड्राय करून इंधनासाठी वापरला जातो. क्रेशरमधून टाकीमध्ये रस जातो. त्यानंतर प्रोसिजर युनिटमध्ये रसावरती प्रक्रिया केली जाते. गुऱ्हाळ स्वयंचलित असल्याने २५० सेल्सिअस बॉयलरसाठी कायमस्वरूपी तापमान ठेवले जाते. गुळाचे तापमान शेवटपर्यंत ११५ सेल्सिअस ठेवले जाते. यामुळे एकसारखा परिपक्व गूळ होण्यास मदत होते. तसेच गूळ अपरिपक्व राहत नाही किंवा करपला जात नाही. एकूण तीन प्रोसिजर युनिटमधून परिपक्व गूळ बाहेर पडतो.’’

स्टीलच्या ट्रेमध्ये साठवला जातो गूळ
विशेष म्हणजे हा गूळ जमिनीवर सिमेंटच्या बांधलेल्या वाफ्यामध्ये न साठवता स्टीलच्या ट्रेमध्ये एकत्र केला जातो. सिमेंटच्या वाफ्यामध्ये गूळ असल्यास त्यामध्ये कर्मचाऱ्यांचा वावर येतो. मात्र, तीन फूट उंचीच्या स्टीलच्या ट्रेमध्ये गूळ साठवल्यास स्वच्छ राहण्यास मदत होते. गुऱ्हाळ बंदिस्त असल्याने माशी, कचरा, बग्यास, धुळ, राख, प्रदूषण या गोष्टीपासून दूर राहत शुद्ध गूळ तयार होतो. गूळ तयार करताना रसायन ऐवजी भेंडी, चुना व एरंडेल तेलाचा वापर केला जातो. गुऱ्हाळाचे धुराडे ६० फूट उंच बांधण्यात आले आहे.

महाराष्ट्रात व महाराष्ट्राबाहेर अनेक शेतकऱ्यांना अत्याधुनिक गुऱ्हाळे बांधून दिली. स्वतःचे सेंद्रिय गुऱ्हाळ असावे, अशी इच्छा होती. कॅन्सर, हृदयरोग व मधुमेह मुक्तीसाठी शुद्ध व सेंद्रिय गुळाची गरज आहे. ही बाब लक्षात घेऊन चांगले गुऱ्हाळ घर बांधले आहे. अनेक गुऱ्हाळ निर्मितीचा अनुभव यावेळी कामी आला. जिल्ह्यात बंदिस्त गुऱ्हाळाचा पहिलाच यशस्वी प्रयोग करत असल्याचा आनंद आहे.
- बळवंत दोरगे, गुऱ्हाळ चालक

सेंद्रिय गुळापासून तयार होणाऱ्या वस्तू
गुळाच्या ढेपा व वड्या, शेंगदाणा साय, क्यूब, बडीशेप गूळ, तिळगुळ, काकवी, गुलाब गूळ, विलायची पावडर, आले पावडर.

सात कामगार चालवतात २५ टनी गुऱ्हाळ
गुऱ्हाळाचे क्षेत्र व कामगार संख्या
मिल प्रेशर - २
बॉयलर - १
पॅकिंग - ३
प्रोसिजर -१

कर्मचाऱ्यांना मिळाणाऱ्या सुविधा
विश्रांतीगृह
स्वच्छतागृह
स्वतंत्र पॅकेज युनिट
आरोग्याच्या सुविधा

03091, 03092, 03093

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bihar Government: गृहखातं हातातून निसटलं, पण 'हे' मलाईदार विभाग नितीश कुमारांच्या 'जेडीयू'कडे

Gondia Crime : वडिलाचा मुलीवर लैंगिक अत्याचार; अत्याचार पीडित मुलीने एका बाळाला दिला जन्म

Gadchiroli News : मारेदुमिल्ली जंगलातील चकमक ‘खोटी कथा’; आमच्या कार्यकर्त्यांना बनावट एनकाउंटरमध्ये मारले—माओवादी पत्रकाचा आरोप!

Pune Crime: कोरेगाव पार्कमध्ये वेश्या व्यवसायाचं रॅकेट उघडकीस, हॉटेलवर पोलिसांचा छापा; विदेशी महिला अटकेत

Gadchiroli News : शरणागतीनंतर नवजीवनाची पहाट; अर्जुन–सम्मी दाम्पत्याला पुत्ररत्न, पुनर्वसन योजनांचा गडचिरोलीत उज्ज्वल परिणाम!

SCROLL FOR NEXT