पुणे

टांझानियाच्या शिष्टमंडळाकडून पारगाव सोसायटीचे कौतुक

CD

खुटबाव, ता. २१ : भारतातील ग्रामीण भागातील सहकार चळवळ जाणून घेण्यासाठी, टांझानिया या देशातील पास लिझिंग या कंपनीचे आठ सदस्यीय शिष्टमंडळ भारताच्या अभ्यास दौऱ्यावर आलेले आहे. जिल्ह्यातील सर्वात मोठी आर्थिक उलाढाल असणाऱ्या पारगाव (ता.दौंड) सोसायटीचे कामकाजाचे पथकाने कौतुक केले.
नाबार्ड बँकेच्या नाबार्ड कन्सल्टन्सी आणि पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक यांच्या संयुक्त विद्यमाने या अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले. ग्रामीण भागातील सहकार चळवळ समजून घेणे, त्याअंतर्गत सहकारी संस्थांचा होणारा कर्जपुरवठा, सुरू असणारे इतर व्यवसाय, संस्थेचे प्रशासन, सहकारी संस्थांची कामाची पद्धत इ. गोष्टींची माहिती या अभ्यास दौऱ्यात जाणून घेतली जावी या अनुषंगाने संपूर्ण महाराष्ट्रातून पारगाव सोसायटीची या अभ्यास दौऱ्यासाठी निवड केली होती. या सहकारी संस्थेची टांझानिया शिष्टमंडळाने दि. १९ फेब्रुवारी २०२६ रोजी प्रत्यक्ष पाहणी केली. या शिष्टमंडळामध्ये पास लिझिंग कंपनीचे अध्यक्ष लिनस चेन्या गेडी, संचालक पीटर बर्नबास शाओ उरियो, डोमिनिक टिमोथी, रोझबड व्हायलेट कुर्वीजिला, किलो रशीद लुस्सेवा, निमा लुकस न्यांगारामेला, मारिया रॉबर्ट वाम्बुरा, पीटर जेकब मो या सदस्यांचा समावेश होता.
पारगाव सोसायटीचे खतविभाग, औषध विभाग, धान्यविभाग, अवजार बँक आणि प्रशासन विभाग याची प्रत्यक्ष माहिती या शिष्टमंडळाला पारगाव सोसायटीचे अध्यक्ष मच्छिंद्र ताकवणे व सचिव दत्तात्रेय शितोळे यांनी दिली. प्रशासकीय पदाधिकारी म्हणून नाबार्ड बँकेचे सहव्यवस्थापक हेमंत कुंभारे आणि ग्रेव्हील तर जिल्हा बँकेचे रमेश बांडे हे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी उपाध्यक्षा चैत्राली काळे, संचालक नामदेव ताकवणे, संभाजी ताकवणे, चंद्रकांत ताकवणे, संजीव ताकवणे, निलेश ताकवणे, महादेव डोमाळे, चंद्रकांत शिशुपाल, लता ताकवणे, श्यामराव ताकवणे, अतुल ताकवणे, संतोष ताकवणे, भाऊसाहेब बोत्रे, दत्तात्रेय निंबाळकर यांनी पथकाचे स्वागत केले.


03335

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी, महागाई भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय

America-Israel War: आता लास्ट.. बुधवारपर्यंत ऐकलं नाही तर...; ट्रम्प यांचा इराणला आणखी एक अल्टिमेटम

Latest Marathi News Live Update: अमरावतीत न्यायालयासमोर वकिलाला महिलांकडून मारहाण

Sangli Politics : सांगली महापालिकेत भाजप-काँग्रेसचं धक्कातंत्र! पराभूत उमेदवारांना दिली संधी, निष्ठावंतांचा पत्ता केला कट, यादीत अनेक अनपेक्षित नावे

Solapur Police Raid Orchestra Bars : एकाच रात्री 3 ऑर्केस्ट्रा बारवर पोलिसांचे छापे; महिलांसह 91 संशयितांवर गुन्हे दाखल; 1.21 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त

SCROLL FOR NEXT