खुटबाव, ता. १ : बिबट्यांचे हल्ले रोखण्यासाठी उपाययोजना करा आणि शेतकऱ्यांना दिवसा वीज द्या, अशी दौंडचे आमदार राहुल कुल यांची विधानसभेत मागणी केली. पश्चिम महाराष्ट्रात, विशेषतः पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात वाढलेल्या बिबट्यांच्या वावरामुळे शेतकरी आणि नागरिक प्रचंड दहशतीत आहेत. शासनाने यावर उपाययोजना करण्याचे निश्चित केले असले तरी, त्याची अंमलबजावणी अत्यंत वेगाने होणे आवश्यक आहे. रात्रीच्या वेळी शेतात पाणी भरण्यासाठी जाताना बिबट्यांचा धोका सर्वाधिक असतो. त्यामुळे शेतकऱ्यांच्या जिवाचे रक्षण करण्यासाठी महावितरणने दिवसा वीजपुरवठा करावा. राज्य सरकारने सामान्य शेतकऱ्यांच्या वीज बिलात सवलत किंवा माफी दिली आहे. मात्र, ग्रामीण भागातील जे छोटे शेतकरी एकत्र येऊन ''सहकारी वीज संस्थांच्या'' माध्यमातून शेतीपंपांसाठी वीज घेतात, त्यांना अद्याप ही सवलत मिळालेली नाही. हा शेतकरी अत्यंत लहान घटक असून, त्यांनाही वीज बिलातून माफी किंवा सवलत मिळावी, अशी मागणी आमदार कुल यांनी मुख्यमंत्री आणि वनमंत्री यांच्याकडे केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.