पुणे

पारगावात बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद

CD

खुटबाव, ता. ३ : पारगाव (ता. दौंड) परिसरातील शिंदेवाडीत बिबट्या जेरबंद करण्यात आला. आकाश ताकवणे यांच्या शेतामध्ये तीन दिवसांपूर्वी बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावला होता. या पिंजऱ्यात सोमवारी (ता. २) भक्ष्याच्या शोधात आलेला बिबट्या जेरबंद झाला. वनविभागाने दुपारी ३.०० वाजता त्यास ताब्यात घेतले.

गेली १५ दिवसांपासून नागरिक राहात असलेल्या लोकवस्तीमध्ये बिबट्या वारंवार लोकांच्या अंगावर धावून येत होता. तसेच तेथील पशुधनावर म्हणजेच शेळी, मेंढी व कोंबडी यांच्यावर हल्ला करत होता. त्यामुळे ग्रामस्थ नाना जेधे यांनी परिसरात पिंजरा लावावा, अशी मागणी वनविभागाकडे केली होती. त्यानंतर लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाला. या घटनेची माहिती मिळताच वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली व बिबट्यास ताब्यात घेतले. दरम्यान, बिबट्यास ताम्हिणी घाट परिसरातील सोडण्यात आला.
यावेळी दौंडचे वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल काळे, वनपाल अंकुश खरात, वनरक्षक वीरेंद्र लकेश्वर, वन अधिकारी अक्षय शितोळे, शिवकुमार बोंबले, वन कर्मचारी भरत शितोळे, सुरेश पवार उपस्थित होते.

बिबट्या व मानव संघर्ष होणार नाही याची दक्षता सर्वांनी घ्यावी. शेतीची बसून करावयाची कामे करताना विशेष दक्षता घ्यावी. लहान मुलांना खेळताना शाळेत जाताना एकट्याला सोडू नये. समूहाने जावे शेतीची कामे करावीत. रात्री बाहेर पडताना टॉर्चचा वापर करावा. घुंगराची काठी सोबत ठेवावी. मोबाइलचे आवाज सुरू ठेवून अथवा टेपरेकॉर्डर वाजवून शेतामध्ये जावे, असे वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल काळे यांनी सांगितले.

03376

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Latest News: युद्धाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात बंदोबस्त वाढवला; शहरात किती इराणी लोक राहतात?

एकदाचं ठरलं! पंचायत समित्यांचे सभापती-उपसभापती १२ मार्चला तर १८ मार्चला ठरणार झेडपीचे अध्यक्ष; हात उंचावून सदस्य करणार मतदान, वाचा...

भावाशी बोललो! इस्रायल इराण युद्धानंतर पीएम मोदींचा आखाती देशांच्या प्रमुखांना कॉल, काय म्हणाले?

Latest Marathi News Live Update: शरद पवार दिल्लीला जाणारच, मविआकडून राज्यसभेसाठी नावावर एकमत?

Leopard Caught : नागापूर येथे एका महिन्यात चार बिबटे जेरबंद

SCROLL FOR NEXT