पुणे

भांडगावातील भक्तामर कलशतीर्थाचे काम पूर्ण

CD

खुटबाव, ता. ९ : ‘‘भांडगाव (ता. दौंड) येथे लोकसहभागातून पाच कोटी रुपये किमतीच्या पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठे भक्तामर कलश तीर्थ बांधण्यात आले आहे. १८ हजार स्क्वेअर फुट बांधकाम असणारे हे कलशतीर्थ वीस गुंठेमध्ये साकारण्यात आले आहे. बुधवार (ता. ११) ते शनिवार (ता. १५) या कालावधीमध्ये स्थानकामध्ये होणाऱ्या पंचकल्याणक प्रतिष्ठा महोत्सवामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमाबरोबरच कलश तीर्थाचे पंचकल्याणक प्रतिष्ठा महोत्सवामध्ये होणार आहे,’’ अशी माहिती आचार्य डॉ. प्रणाम सागरजी महाराज यांनी दिली

या कार्यक्रमासाठी जैन समाजातील गणाचार्य श्री कुंथुसागरजी महाराज, गणाचार्य पुष्पदंत सागरजी महाराज, राष्ट्रसंत आचार्य गुणधरनंदिनी महाराज, सूर्यसागरजी महाराज, विनम्र सागरजी महाराज, आचार्य प्रसन्न ऋषीजी महाराज, याशिवाय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, खासदार सुप्रिया सुळे, आमदार राहुल कुल राहणार आहेत. कार्यक्रमाचे अध्यक्ष चंदुकाका सराफ उद्योग समूहाचे प्रमुख किशोर शहा राहणार आहेत. तसेच उपाध्यक्ष सुजाता शहा, महामंत्री सारंग शहा, कोषाध्यक्ष ॲड. स्वप्निल शहा यांनी संयोजन केले आहे.
चार दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमासाठी ५० हजार भाविकांची बसण्याची व भोजनाची सोय केली आहे. या कार्यक्रमांमध्ये संपूर्ण भारतातील जैन धर्माचे ३० साधू संत उपस्थित राहणार आहेत. तसेच दररोज शांती मंत्र जप म्हटला जाणार आहे. प्रणाम सागरजी महाराज यांच्या मातोश्री निर्मलाजी महाराज यांचा दीक्षा समारंभ होणार आहे. या कलश तीर्थामध्ये दररोज भाविकांसाठी मोफत दवाखाना, भोजनालय, औषधे, विश्रामगृह व भक्त निवास यांच्या सुविधा देण्यात येत आहेत. भक्त निवासासाठी यवत येथील लालचंद नहार यांनी २० गुंठे जागा मोफत दिली आहे. कलश तीर्थ मंदिरामध्ये भगवान पद्मप्रभु यांच्या मूर्ती बरोबरच नवग्रहांच्या नऊ मूर्तींची प्रतिष्ठापना केली आहे. कार्यक्रमानिमित्त या मंदिराला विद्युत रोषणाई केली आहे.


माझ्या आयुष्यातील हा सर्वात मोठा क्षण आहे. संपूर्ण जगामध्ये अहिंसा, बंधुभाव ही भावना जोपासण्यासाठी सध्या तसेच सध्याच्या युद्धजन्य यांचे परिस्थितीमध्ये शांतता निर्मितीसाठी यज्ञ या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमांमध्ये ४८ किलोमीटर लांब कापडावर १८ भाषांमध्ये लिहिलेले भक्तामर गाथेची ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड बुक’ मध्ये नोंद होणार आहे.
- प्रणाम सागरजी महाराज

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karad News : महाराष्ट्र केसरी स्पर्धेसंदर्भात महाराष्ट्रातील पैलवानांना क्रीडामंत्र्यांचा शब्द, म्हणाले....

Mohol News : भाजपचे मुस्लिम समाजाला 'रमजान'चे गिफ्ट; पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपचे अस्लम चौधरी, उल्का पाटील उपसभापती

Mojtaba Khamenei: ''प्रत्येक मृत्यूचा बदला घेऊ'', इराणच्या सर्वोच्च नेत्याने दिला पहिलाच इशारा; म्हणाले...

Nilanga Fire : निलंगा बस डेपोत डिझेल भरताना पंपाला लागली आग; तेल भरणारा वाहन परिक्षक भाजला, बसही पेटली

Leopard Attack: बिबट्यांना मारणे गुन्हा राहणार नाही; अनुसूची बदलण्यास मंजुरी, वाढत्या हल्ल्यांवर महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT