खुटबाव, ता. १६ ः देलवडी (ता. दौंड) येथे सोमवारी (ता. १६) अखंड हरिनाम सप्ताहाची काल्याच्या कीर्तनाने सांगता झाली. संतराज महाराज संस्थानचे अध्यक्ष नामदेव महाराज साठे यांनी काल्याच्या कीर्तनामध्ये श्री कृष्णलीला सांगितल्या. यावेळी दहीहंडी फोडून भाविकांना प्रसाद देण्यात आला.
यावर्षी कीर्तन मालेचे ४२वे वर्ष असून, या सप्ताहामध्ये सात दिवस ज्ञानेश्वर महाराज राजपुरे (खुटबाव), दयानंद महाराज हांडगर (रांजणगाव सांडस), बाळासाहेब महाराज जगताप (चोपडज), गोविंद महाराज शिंदे (कर्जत), रामेश्वर महाराज भोजने (आळंदी), शरद महाराज काळे (शिंपोरे), प्रकाश महाराज जंजिरे (राशिन) यांनी कीर्तनसेवा केली. तसेच, संतोष महाराज गायकवाड, संतोष महाराज भागवत, नितीन महाराज टुले, रामचंद्र महाराज नातू, संजय महाराज ढम यांनी प्रवचने सांगितली. रविवारी (ता. १५) दिंडीची ग्राम प्रदक्षिणा झाली. यावेळी रांगोळी व पायघड्यांनी ग्रामस्थांनी दिंडीचे स्वागत केले. सायंकाळी दीपोत्सव साजरा करण्यात आला. महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली. या कीर्तन मालेनिमित्त गावातील दानशूर ग्रामस्थांनी अन्नदान, वर्गणी व दूध देत कार्यक्रमास सहकार्य केले. हरिनाम सप्ताहानिमित्त गावातील प्रत्येक कुटुंबाने आपापल्या इच्छेने दोन लाख ८० हजार वर्गणी करत कार्यक्रमास सहकार्य केले.
03415
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.