पुणे

मुजावर कुटुंबातील बहीण-भावाची पोलिसपदी निवड

CD

खुटबाव, ता. २२ : पारगाव (ता. दौंड) येथील मुजावर कुटुंबातील चुलत बहीण-भावाने पोलिस शिपाई पद मिळवत यशाची मोहोर उमटवली आहे. या कुटुंबातील गवंड्याच्या हाती बिगारीकाम करणारे थोरले बंधू अब्दुल मुजावर यांची कन्या सलमा हिने ठाणे पोलिसांत शिपाई पद, तर एका खासगी कंपनीमध्ये कामगार म्हणून काम करणारे मधले बंधू राजू मुजावर यांचे चिरंजीव अरबाज याने पिंपरी चिंचवड पोलिसांत शिपाई पद मिळवले आहे.
मूळचे मुढाळे (ता. बारामती) या दुष्काळी भागातील मुजावर कुटुंब १९७२ च्या दुष्काळामध्ये उपासमारीमुळे पारगाव येथे स्थलांतरित झाले. त्यानंतर कष्ट करत आपल्या अपत्यांना शिकवले. सलमा हिने फूड प्रोसेसिंग या विषयाची पदवी पूर्ण केली. पोलिस बनण्याचा निर्णय घेतला. पारगाव येथील विजय पंडित यांनी तिला मार्गदर्शन केले. खासगी शिकवणी न लावता, गावाकडील रस्त्यावर धावण्याचा सराव करीत तसेच घरीच अभ्यास करत तिने वयाच्या २२ व्या वर्षी १७ वे मानांकन मिळवत पोलिस होण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे, तर अरबाज याने तळेगाव दाभाडे येथील शासकीय विद्यालयात शिक्षण पूर्ण केले. धावण्यासाठी खासगी ॲकॅडमीचा आधार घेतला. पहिल्याच प्रयत्नात त्यालाही पोलिस शिपाईपद मिळाले.

शहनाईपूर्वीच कुटुंबामध्ये आनंदोत्सव
पोलिसपदी निवड झालेली सलमा हिचे लग्न रविवारी (ता. २६) होणार आहे. भरती होण्यापूर्वीच तिचे लग्न ठरले होते. लग्न आठवड्यावर आल्यावर अचानक मुजावर कुटुंबामध्ये एकाच दिवसात दोन पोलिस भरती झाल्याची माहिती संकेतस्थळावरून समजली त्यामुळे कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-Nepal Dispute: सीमा वादावर नेपाळचा मवाळ सूर! भारताविरोधात संघर्ष नव्हे, संवाद हवा, परराष्ट्र मंत्र्यांचं मोठं विधान

IND vs AFG Test, 2nd Day: भारताच्या साडेपाचशे धावा अन् अफगाणिस्तानचा अर्धा संघ तंबूत; पदार्पणवीर मानव सुतार चमकला

Crime: लग्नाआधीच वधू पळाली, नंतर बहीणीसोबत लग्न ठरवलं; पण तिचं भलतंच सत्य समोर येताच वर संतापला अन्... थरारक घटनेनं मंडपात खळबळ

Banana Crop Damage: क्षणात होत्याचे नव्हते! वादळाने ४०० एकरांवरील केळी पीक जमीनदोस्त; शेतकरी हवालदिल, लवंग परिसरात कोट्यवधींचे नुकसान

वाईट ब्रेकअप होऊनही सचिन पिळगावकरांनी निभावलं एक्स गर्लफ्रेंडला दिलेलं वचन !

SCROLL FOR NEXT