पुणे

''वसुंधरा ग्रीन''ला दिलेला दाखला रद्द करा

CD

कुरकुंभ, ता. १८ : दौंड तालुक्यातील खडकी ग्रामपंचायतीने नव्याने उभारण्यात येणाऱ्या वसुंधरा ग्रीन बायो एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला दिलेला न हरकत दाखला भविष्यातील प्रदूषणाचा धोका निर्माण होऊ शकतो. यामुळे तो रद्द करण्याची मागणी ग्रामस्थांनी लेखी ग्रामस्थांनी
ग्रामपंचायत व जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
खडकी ग्रामपंचायतीने कंपनीला दिलेला ''ना हरकत'' दाखला रद्द करण्याची मागणी ग्रामस्थांनी लेखी निवेदनाद्वारे सोमवारी (ता. १७) ग्रामपंचायत व कंपनी व्यवस्थापनाकडे केली आहे. निवेदनामध्ये वसुंधरा ग्रीन बायो एनर्जी कंपनीमुळे भविष्यात प्रदुषणाचा ग्रामस्थ, शेती, पशुपालनावर दुष्पपरिणाम होणार असल्याने मोठ्या नुकसानीला समोरे जावे लागणार आहे. हे नुकसान टाळण्यासाठी ग्रामपंचायतीने कंपनी चालू करण्यासाठी दिलेला न हरकत दाखला विशेष ग्रामसभा बोलावून रद्द करण्याची मागणी लेखी निवेदनात केली आहे. निवेदनावर माजी पंचायत समिती सदस्य प्रकाश नवले, माजी सरपंच मंगेश शितोळे, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य प्रणाल शितोळे, संजय जाधव, सचिन काळभोर, अमोल काळे, संतोष जाधव, विजय गुणवरे आदी ग्रामस्थांच्या स्वाक्षरी आहेत. या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आली आहे.

मका व तांदळापासून बायो गॅस निर्मिती होणार आहे. प्रक्रियेनंतर शिल्लक राहणारे धान्याचा भाग जनावरांचा चारा म्हणून वापर होणार आहे. त्यामुळे प्रदूषणाचा व नुकसानीचा प्रश्नच येणार नाही.
- विकास रासकर, कंपनीचे प्रमुख

वसुंधरा ग्रीन बायो एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने ना हरकत दाखल्यासाठी ग्रामपंचायतीकडे अर्ज केल्यानंतर सात महिन्यानंतर ग्रामसभेच्या परवानगीने दाखला देण्यात आले
- सविता शितोळे, सरपंच, खडकी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Numerology: स्वतःचेच रील्स पुन्हा पुन्हा पाहतात 'या' मूलांकांचे लोक! पाहा कोणत्या तारखेला जन्मलेले लोक असतात 'सेल्फ लव्हर'...

Sugarcane Crushing Season : १५ ऑक्टोबरपासूनचा गाळप हंगामाचा निर्णय रद्द करावा; विविध संघटनांची साखर आयुक्तांकडे मागणी

Kokan Railway : पाच वर्षांत कोकण रेल्वेवर रोज १०० हून अधिक गाड्या; दुपदरीकरणाला वेग, २२ सप्टेंबरला कोकण रेल्वे होणार कर्जमुक्त

Mumbai High Court : घटस्फोटाच्या निकालाला स्थगिती असताना पत्नीला घराबाहेर काढता येणार नाही; मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश

सिनेसृष्टीला धक्का! 'वेलकम' फेम अभिनेत्याचं वयाच्या ५६व्या वर्षी निधन; 15 दिवसांपासून होते इस्पितळात

SCROLL FOR NEXT