पुणे

कुरकुंभच्या मनालीची बीएसएफमध्ये निवड

CD

कुरकुंभ, ता. २२ : कुरकुंभ (ता. दौंड) येथील मनाली दयानंद कानडे हिची भारतीय सीमा सुरक्षा दलात (बीएसएफ) निवड झाली. येथील जेपी लॅब कंपनीमध्ये कार्यरत असलेले दयानंद कानडे हे तिचे पिता होत. पुणे येथील सीआरपीएफ ग्राउंडवर पार पडलेल्या बीएसएफ भरती प्रक्रियेत मनालीने लेखी परीक्षा, मैदानी चाचण्या, धावणे तसेच इतर शारीरिक चाचण्यांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली. तिच्या या कामगिरीची दखल घेत बीएसएफकडून तिची निवड अधिकृतपणे जाहीर करण्यात आली. मनालीची निवड झाल्याबद्दल कुरकुंभ परिसरात तसेच समाजातील सर्व स्तरांतून तिचे अभिनंदन करण्यात येत आहे. या निवडीनंतर मनालीला नवी दिल्ली येथे प्रशिक्षणासाठी पाठविण्यात येणार आहे. या यशाबद्दल बोलताना मनाली म्हणाली की, ‘‘या निवडीमागे माझे परिश्रम आणि आत्मविश्वास असून, या संपूर्ण प्रवासात आई-वडिलांचे मोलाचे मार्गदर्शन आणि प्रेरणा मिळाली.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ 3rd T20I : ११ महिन्यांनी आला अन् चमकला! हार्दिक, जसप्रीत, हर्षितसह न्यूझीलंडवर 'तो' भारी पडला; वर्ल्ड कपसाठी दावा ठोकला

Pune News : गर्दीतून पुढे येत मयूरने वाचवला जीव; फीट आलेल्या व्यक्तीला दिली तातडीची मदत

Latest Marathi news Live Update : सोफिया कुरेशी यांना विशेष सेवा पदक प्रदान करण्यात येणार

कर्तव्यपथावर देशभक्तीचा जल्लोष! प्रजासत्ताक दिनाचा भव्य सोहळा कसा असेल? यावर्षीची थीम काय? जाणून घ्या संपूर्ण कार्यक्रम

Republic Day 2026 : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींचे राष्ट्राला संबोधन- "युवा पिढी देशाच्या बहुआयामी विकासाला दिशा देत आहे"

SCROLL FOR NEXT