पुणे

संत नरहरी सोनार यांना कुरकुंभमध्ये अभिवादन

CD

कुरकुंभ, ता. ५ : कुरकुंभ (ता. दौंड) येथील प्राचीन फिरंगाई मंदिरात बुधवारी (ता. ४) संत शिरोमणी नरहरी सोनार यांची पुण्यतिथी मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात साजरी करण्यात आली. यावेळी नरहरी सोनार यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी ‘देवा तुझा मी सोनार, तुझ्या नामाचा व्यवहार’, या अभंगांच्या गजराने परिसर मंगलमय झाला होता. उपस्थित भाविकांनी भजन-कीर्तनातून संत नरहरी सोनार यांच्या कार्याची व विचारांची आठवण जागवली. कार्यक्रमानंतर प्रसादाचे वाटप करण्यात आले. या सोहळ्यास गावातील ग्रामस्थ व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात बाळासाहेब डहाळे, आनंद डहाळे, प्रभाकर कुलथे यांच्यासह इतर मान्यवरांनी सहभाग घेतला. भक्तिपूर्ण वातावरणात भजन- कीर्तनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pandharpur : नववर्षाच्या स्वागताला सावळ्या विठुरायाचे मंदिर सजले; गुढीपाडव्यानिमित्त पंढरपुरात भक्तांची मांदियाळी, पांडुरंगाला अर्पण केला 5 किलो वजनाचा साखरेचा हार

Dhananjay Sawant Accident : भाजप नेत्याच्या गाडीचा मध्यरात्री भीषण अपघात, कंटेनरच्या धडकेत फॉर्च्युनरचा चक्काचूर, जीवित हानी टळली

Indian Army Rocket System: आता शत्रूंची खैर नाही! पोखरणमध्ये पिनाका रॉकेटची यशस्वी चाचणी; भारताच्या संरक्षणशक्तीला नवी उंची

'या' तारखेवर जन्मलेल्या लोकांचा एकमेकांशी असतो 36 चा आकडा ! भेटल्यावर भांडण होणारच

Exam Paper Theft: धक्कादायक! दहावीच्या विद्यार्थ्यानेच चोरली प्रश्नपत्रिका; सांगोला विद्यामंदिरात खळबळ..

SCROLL FOR NEXT