पुणे

ऊसतोड कामगारांचा परतीचा प्रवास सुरू

CD

कुरकुंभ, ता. १८ : दिवाळीनंतर सुरू झालेला ऊसतोड हंगाम संपला असून मराठवाड्यातील विविध जिल्ह्यांतून आलेले हजारो ऊसतोड कामगार कुटुंबांसह गावाकडे परतू लागले आहेत. उपजीविकेसाठी दरवर्षी हे कामगार सहकारी साखर कारखान्यांच्या परिसरात स्थलांतर करतात. हंगामभर कारखाना परिसरात वास्तव्यास राहिल्यानंतर आता परतीचा प्रवास सुरू झाला आहे.
या स्थलांतराचा थेट परिणाम मुलांच्या शिक्षणावर होतो. आई-वडिलांसोबत येणाऱ्या अनेक मुलांचे शिक्षण खंडित होते. काही मुले हंगामभर शाळेबाहेर राहतात. शिक्षणाची सातत्यपूर्ण व्यवस्था नसल्याने त्यांच्या भवितव्यावर परिणाम होत आहे.
ऊसतोड कामगारांच्या श्रमांवर सहकार क्षेत्र उभे आहे. मात्र निवास, आरोग्य, पिण्याचे पाणी, स्वच्छता आणि सामाजिक सुरक्षेच्या सुविधा अनेक ठिकाणी अपुऱ्या आहेत. स्थलांतरित महिला कामगारांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही महत्त्वाचा आहे.
कारखान्यांभोवती आर्थिक व्यवहारांची चक्रे सुरू असताना ऊसतोड कामगार मात्र असुरक्षिततेत जीवन जगत आहेत. हंगाम संपून ते गावाकडे परतले असले, तरी शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक सुरक्षेसाठी ठोस धोरण राबविण्याची गरज कायम आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NED, T20 WC: नेदरलँड्सला 'गुजरात'च्या कर्णधाराची मदत! भारताची कोंडी केली; शिवम-हार्दिक जोडी संकटमोचक ठरली

School Bus Strike: परीक्षांच्या तोंडावर स्कूल बस संघटनेचा संपाचा इशारा!'या' दिवशी राज्यभर सेवा ठप्प ठेवणार, मागण्या काय?

Ajit Pawar Plane Crash: ''दादाच राहिला नाही, आता खरं-खोटं करून काय उपयोग?'' सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

Teacher News: महत्त्वाची बातमी! शाळेतील शिक्षकांना नियमित करणार; राज्य सरकारचा मोठा निर्णय, वेतनश्रेणीला मंजुरी

Latest Marathi News Live Update : मुलुंड मेट्रो बांधकाम दुर्घटनेत पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT