पुणे

भारनियमनामुळे जिरेगावकर त्रस्त

CD

कुरकुंभ, ता. ४ : जिरेगाव (ता. दौंड) येथे ‘महावितरण’तर्फे सायंकाळी ६ ते १० या वेळेत केल्या जाणाऱ्या भारनियमनामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. उन्हाळ्याच्या कडाक्यामुळे ही वेळ गैरसोयीची ठरत असून, भारनियमन पहाटेच्या सत्रात करावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
सध्या वाढत्या उकाड्यामुळे नागरिक हैराण आहेत. सायंकाळच्या वेळीच वीजपुरवठा खंडित होत असल्याने ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि शेतकऱ्यांचे हाल होत आहेत. घरात बसणे असह्य होत असून अंधारामुळे दैनंदिन कामांत अडथळे येत आहेत. यामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे.
याबाबत ज्येष्ठ नागरिक अरविंद भापकर म्हणाले, ‘‘सायंकाळची वेळ नागरिकांसाठी त्रासदायक आहे. ‘महावितरण’ने वेळापत्रकात बदल करून भारनियमन पहाटे ६ ते १० या वेळेत ठेवावे, जेणेकरून रात्री नागरिकांना दिलासा मिळेल.’’ प्रशासनाने या मागणीची तातडीने दखल घ्यावी, अशी भावना परिसरातून व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nanded Gangwar: नांदेडमध्ये मध्यरात्री गॅंगवार; जुन्या वैमनस्यातून तलवार-खंजीर हल्ल्यात तिघांचा खून, शहरात भीतीचे वातावरण

Multibagger Stocks: 1 लाखाचे 30 लाख! Market Crash असताना या 3 शेअर्सने गुंतवणूकदारांना केल मालामाल

'धुरंधर २' मध्ये फक्त ५ सेकंद दिसली पण पैसे किती मिळाले माहितीयेत? अनेकांचा वर्षाचा पगार नाही तितका

काँग्रेसकडून बारामती पोटनिवडणुकीची तयारी, जय पवार म्हणाले, बिनविरोधसाठी आमचा प्रयत्न पण...

Latest Marathi News Live Update : मुंबईहून 18 टन ऑटो LPG संभाजीनगरमध्ये जाणार

SCROLL FOR NEXT