लोणी देवकर, ता. ५ : लोणी देवकर (ता. इंदापूर) येथील औद्योगिक विकास महामंडळाने प्रदूषित पाण्याच्या संदर्भात प्रदूषण नियमक मंडळाला कारवाई संदर्भात पत्र देऊन २५ दिवसांचा कालावधी लोटला आहे. दूषित पाण्यावर अद्यापही कोणतीही ठोस कार्यवाही झाल्याचे दिसत नसून प्रदूषित पाणी उघड्यावरच पाहायला मिळत आहे. यामुळे औद्योगिक विकास महामंडळाच्या पत्राला प्रदूषण नियमक मंडळाने केराची टोपली दाखवल्याचे दिसत आहे. यामुळे प्रदूषित पाण्याचा गंभीर बनला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, इंदापूर तालुक्यातील लोणी देवकर, बळपुडी या भागांमध्ये औद्योगिक वसाहत निर्माण करून स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आले. मात्र कंपन्यांमध्ये परप्रांतीयांची चलती होऊन स्थानिकांना रोजगारही दुरापस्त झालेला असताना कंपन्यांचे प्रदूषण मात्र स्थानिकांना सोसावा लागत आहे. याबाबत सकाळने सचित्र वृत्त प्रसिद्ध करत स्थानिकांच्या समस्या औद्योगिक विकास महामंडळाचे लक्ष वेधले होते. यावर २५ दिवसांपूर्वी स्थानिकांच्या आरोग्याशी निगडित असलेल्या प्रदूषित पाण्यासंदर्भात औद्योगिक विकास महामंडळाकडून प्रदूषण नियमक मंडळाला चौकशी करून उचित कार्यवाही करण्याबाबत कळवले होते. मात्र अद्यापही यावर कोणतीही कार्यवाही झालेली पाहायला मिळत नाही. अद्यापही दूषित पाणी पूर्वीसारखेच उघड्यावरच सोडले जात असून याचा फटका या भागातील स्थानिक शेतकरी नागरिक पशुपक्षी यांना बसत आहे. यातून दूषित पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीरच होत चाललेला आहे.
याबाबत औद्योगिक विकास महामंडळाचे क्षेत्रीय अधिकारी महेश बल्लाळ यांना विचारले असता त्यांनी प्रदूषण नियमक मंडळाकडून अद्यापपर्यंत आम्हाला कोणताही अहवाल प्राप्त झाला नाही. तरी तो अहवाल आल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल असे सांगण्यात आले.
नागरिकांनीच सुरू केल्या दूषित पाण्याच्या तपासण्या
लोणी देवकर औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यांकडून सोडण्यात येत असलेल्या दूषित पाण्यामुळे स्थानिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. मात्र, या सर्व बाबीकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष होत आहे. यावर उपाय म्हणून लोणी देवकर व बळपुडी येथील स्थानिक नागरिकांनीच आपापल्या भागातील पाण्याचे नमुने एकत्रित करत खासगी प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले आहेत. यामुळे लवकरच दूषित पाण्याचा प्रश्न पुराव्यानिशी मांडला जाणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.