लोणी देवकर, ता. २३ ः गंगावळण (ता. इंदापूर) ग्रामपंचायतीच्या १५व्या वित्त आयोगामार्फत उद्योजक प्रशिक्षण कार्यक्रम झाला. प्रशिक्षण पूर्ण केलेल्या महिलांना पळसदेव बिजवडी गटाच्या नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्या हर्षदा जाधव यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले. सरपंच निकिता पाटील यांनी त्यांचा सन्मान केला.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत गंगावळण हे गाव हर्षदा जाधव यांच्याकडे पालक म्हणून आहे. यावेळेस त्यांनी जिल्हा परिषद शाळा ग्रामपंचायत कार्यालयाला भेट दिली. गावाला अभियानामध्ये यशस्वी करण्यासाठी ज्या काही समस्या असतील त्यांचा पाठपुरावा करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. यावेळी ग्रामसेवक हनुमंत पाटील, बारामती राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे लोकसभा अध्यक्ष प्रशांत गलांडे पाटील, अभिजित नलवडे, पोपट बोंगाणे, राजेंद्र पाटील, मारुती कन्हेरे, अतुल नलवडे, नानासो वाळुंजकर, राजेंद्र जगताप, दिनेश जगताप आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.