लोणी देवकर, ता. ९ : ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, विद्यार्थी, महिला व ज्येष्ठ नागरिकांच्या दैनंदिन प्रश्नांचे तातडीने निराकरण करण्यासाठी महसूल विभागाच्या वतीने एकदिवसीय छत्रपती शिवाजी महाराज ‘महाराजस्व’ अभियान शिबिराचे आयोजन केले आहे.
इंदापूर तालुक्यातील लोणी देवकर येथे शुक्रवारी (ता. १०) प्रगती विद्यालयात हे शिबिर पार पडणार आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात मंडळ स्तरावर अशी शिबिरे घेण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असून, त्याअंतर्गत हे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर होणार आहे. या शिबिरात नागरिकांना एकाच ठिकाणी विविध महसूल सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यामध्ये सातबारा उताऱ्यातील दुरुस्ती, डिजिटल सातबारा वाटप, रहिवासी व जात प्रमाणपत्रे, बिगरशेती (एनए) परवानगी, विद्यार्थ्यांसाठी आवश्यक दाखले, पीएम किसान नोंदणी अशा सुमारे १५ प्रकारच्या सेवांचा समावेश आहे. या शिबिराच्या माध्यमातून नागरिकांच्या तक्रारी तत्काळ निकाली काढण्याचा प्रशासनाचा प्रयत्न असणार आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी या सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.