पुणे

उच्च जोखमीच्या हृदयरुग्णावर यशस्वी शस्त्रक्रिया

CD

लोणी काळभोर, ता. ८ : येथील विश्‍वराज हॉस्पिटलमधील तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाने ६० वर्षीय हृदयरुग्णावर अत्यंत गुंतागुंतीची आणि उच्च-जोखमीची ‘कॅल्शियम ऑर्बिटल ॲयरेक्टॉमी’ शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडली. ही प्रक्रिया कार्डियाक सायन्सेस विभागाचे प्रमुख डॉ. सुरज इंगोले यांच्या नेतृत्वाखाली बहुविशेषज्ञांच्या टीमने केली.
या रुग्णाचे मूत्रपिंड निकामी झाल्यामुळे नियमित डायलिसिस सुरू होते. यादरम्यान त्याचा रक्तदाब अचानक कमी होणे, हृदयाचे ठोके अनियमित होणे अशी गंभीर लक्षणे दिसत होती. तपासणी दरम्यान त्यांना ‘ट्रिपल व्हेसल डिसीज’ असल्याचे निदान झाले. या अवस्थेत हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या तीनही मुख्य रक्तवाहिन्या अरुंद झाल्या होत्या. याशिवाय, रुग्णाच्या रक्तवाहिन्यांमध्ये कॅल्शिअम जास्त प्रमाण साचलेले होते आणि हृदयाची कार्यक्षमता सुमारे २० टक्के झाली होती.
या बाबी लक्षात घेऊन डॉक्टरांनी कमी चिरफाडीत होणारी कॅल्शियम ऑर्बिटल ‘ॲयरेक्टॉमी’ ही विशेष प्रक्रिया निवडली. याप्रक्रियेत बारीक नळीच्या मदतीने रक्तवाहिन्यांतील कडक झालेले कॅल्शिअम सुरक्षितरीत्या कमी केले. यानंतर हृदयातील महत्त्वाच्या रक्तवाहिनीत (एलएडी) स्टेंट बसवून रक्तप्रवाह सुरळीत करण्यात आला. उपचारानंतर रुग्णाची प्रकृती स्थिर आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunetra Pawar Devendra Fadnavis Meeting : सुनेत्रा पवार, पार्थ पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला; बारामती पोटनिवडणुकीत भाजपची यंत्रणा सक्रीय

Video Viral: स्मृती मानधनाचे वडील अन् पलाश मुच्छलची बहीण खरंच एकमेकांना भेटले? पुन्हा लग्नाच्या चर्चांना उधाण, नेमकं सत्य काय?

US Iran Ceasefire: युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी पाकिस्तानची धडपड पण चीनचा वेगळाच दावा! ट्रम्प यांनाही मान्य...

Latest Marathi News Live Update: MPSC चा निकाल जाहीर, सोलापूरचा विजय राज्यात पहिला

ना हेअर ट्रान्सप्लांट ना आजार ! 'या' कारणासाठी प्रसाद ओकने केलंय टक्कल; नव्या लुकबद्दल म्हणाला...

SCROLL FOR NEXT