पुणे

कदमवाकवस्तीचे आंदोलन लेखी आश्‍वानानंतर स्थगित

CD

लोणी काळभोर, ता. १५ : कदमवाकवस्ती (ता. हवेली) परिसरातील अतिवृष्टीग्रस्त नागरिकांना नुकसानभरपाई मिळावी, या मागणीसाठी माजी उपसरपंच राजश्री उदय काळभोर यांनी सुरू केलेले बेमुदत उपोषण प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर स्थगित करण्यात आले.
अतिरिक्त तहसीलदार तृप्ती कोलते- पाटील यांनी पाठवलेल्या शिष्टमंडळाने उपोषणस्थळी भेट देत सकारात्मक भूमिका मांडली आणि आवश्यक कार्यवाहीचे लेखी आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलनकर्त्यांनी उपोषण मागे घेतले. या शिष्टमंडळात नायब तहसीलदार मयूर बनसोडे, मंडल अधिकारी लक्ष्मण बांडे तसेच ग्राम महसूल अधिकारी महेश वाघमारे यांचा समावेश होता. त्यांनी बाधित नागरिकांना नुकसानभरपाई देण्यासाठी प्रस्ताव पाठविण्यात आल्याची माहिती देत लवकरच मदत मिळेल, असे स्पष्ट केले.
या उपोषणाला बाजार समितीचे संचालक प्रशांत काळभोर यांनी पाठिंबा दर्शवला होता. तसेच, लोणी काळभोर व कदमवाकवस्ती येथील आजी-माजी ग्रामपंचायत सदस्य आणि उदय काळभोर, चित्तरंजन गायकवाड, गौरी गायकवाड, उपसरपंच नासीर पठाण यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs LSG Live: रिषभ पंतला OUT न होताच मैदान सोडण्यास भाग पाडले, हेझलवूडच्या भन्नाट चेंडूवर अघटीत घडले; लखनौचे टेंशन वाढले

Hormuz Strait: ४८ तासांनंतर होर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे खुली होणार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची घोषणा, नेमकं काय घडलं?

Vinod Kambli Health : विनोदला ब्रेन स्ट्रोकचा धोका; माजी क्रिकेटपटू एकत्र आले, आर्थिक मदतीसाठी WhatsApp ग्रुप, मित्राची माहिती

“त्यांच्यासोबत काम मास्टरक्लाससारखं वाटायचं" अक्षय कुमारने दिला असरानी यांच्या आठवणींना उजाळा ; भूतबंगला सिनेमात केलं अखेरचं काम

शुक्राच्या वृषभ राशीतील संक्रमणामुळे तयार होतोय पंचमहापुरुष राजयोग ! कोणत्या राशींना होणार फायदा घ्या जाणून

SCROLL FOR NEXT