लोणी काळभोर, ता. २४ : अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्याच्या घरातून लॅपटॉपसह इतर साहित्य चोरीला गेल्याची घटना लोणी काळभोर (ता. हवेली) येथील चिंतामणी पार्क परिसरात घडली आहे. ही घटना गुरुवार (ता. २३) सकाळी साडेआठच्या सुमारास उघडकीस आली आहे. याप्रकरणी अथर्व मोहन म्हात्रे (वय २०, रा. श्रमसाफल्य पीजी, फ्लॅट क्रमांक ४०१) यांनी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या चोरीमध्ये सुमारे १० हजार रुपये किमतीचा लॅपटॉप, ५०० रुपयांची लेदर बॅग आणि पर्ससह डेबिट कार्ड, आरसी, ड्रायव्हिंग लायसन्स, आधार व पॅन कार्ड अशी महत्त्वाची कागदपत्रे असा एकूण १० हजार ५५० रुपयांचा मुद्देमाल लंपास झाला आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलिस करत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.