पुणे

श्रमदानातून दोन ट्रॉली कचऱ्याचे संकलन

CD

मंचर, ता.१९ :“स्वच्छ सर्वेक्षण २०२३ व माझी वसुंधरा अभियान ३.० अंतर्गत मंचर (ता.आंबेगाव) नगरपंचायतीच्या कार्यक्षेत्रात पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवारी (ता.१७) सकाळी आयोजित केलेल्या श्रमदान शिबिरात नगरपंचायतीचे अधिकारी, कर्मचारी व परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे भाग घेतला. यावेळी तब्बल दोन ट्रॉली कचरा संकलित करण्यात आला, अशी माहिती मंचर नगरपंचायतीचे मुख्याधिकारी गोविंद जाधव यांनी दिली.
महात्मा गांधी विद्यालयाचा परिसर सकाळी सात ते आठ या वेळेत स्वच्छ करण्यात आला. हातात खराटे, घमेली घेऊन अधिकारी, कर्मचारी व नागरिक स्वच्छता मोहीम राबवीत होते. जाधव म्हणाले “स्वच्छ सर्वेक्षण २०२३ मध्ये मंचर शहरामध्ये घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन, हागणदारीमुक्त शहर, कचऱ्यावर प्रक्रिया, घरोघरी जाऊन कचरा संकलन करणे व अनेक नावीन्यपूर्ण उपक्रम राबवत आहे. मंचर शहरात सिंगल युज प्लास्टिकवर कारवाई करून त्याला अटकाव घातला आहे.


दर मंगळवार व शुक्रवारी मंचर शहरात स्वच्छता मोहीम राबविली जाणार आहे. श्रमदान मोहिमेमध्ये सामाजिक संस्था, ज्येष्ठ नागरिक, महिला बचत गट, व्यापारी, शिक्षण,वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर, युवक-युवती यांनी सहभागी होऊन या सामाजिक उपक्रमाला हातभार लावावा.
- गोविंद जाधव, मुख्याधिकारी मंचर नगरपंचायत.
.............
07298

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: एकाच दिवसात सोन्याच्या भावात मोठी घसरण! मुंबई-पुण्यात सोनं-चांदी स्वस्त; पाहा आजचा ताजा भाव

येरवडा मनोरुग्णालयापेक्षा जनावरांचा गोठा बरा! उग्र वास, अस्वच्छ वॉर्ड अन् रुग्णांनाच जुंपलंय कामाला; आलबेल असल्याचा दावा फोल

DC vs GT, Video: आधी रागात बॅट निसटली, मग फिल्डरकडं पाहिलं अन् ग्लेन फिलिप्स काही क्षणात जोरात धावू लागला; नेमकं काय घडलं?

'मी सावित्रीबाई जोतीराव फुले' मालिकेतील चैत्राली गुप्तेची बहिण आहे प्रसिद्ध अभिनेत्री! सुपरहिट सिनेमांमध्ये केलय काम

Beed Tehsildar Death : लातूर-अंबाजोगाई महामार्गावर भीषण अपघात; केजचे तहसीलदार जागीच ठार, महसूल विभागात शोककळा

SCROLL FOR NEXT