भटक्या कुत्र्यांचा उच्छाद, 972 जणांना चावा sakal
पुणे

Pune : भटक्या कुत्र्यांचा ९७२ जणांना चावा

लग्न सराई व यात्रांचा हंगाम सुरु असल्याने सार्वजनिक ठिकाण व मंगलकार्यालयात जेवणावळी झाल्यानंतर अनेकदा ताटात शिल्लक राहिलेले अन्न उघड्यावरच टाकून दिले जाते. परिणामतः तेथे भटक्या कुत्र्यांच्या टोळ्या तळ ठोकून असतात.

सकाळ वृत्तसेवा

मंचर - आंबेगाव तालुक्यात मोकाट कुत्र्याचा वावर व उपद्रव वाढला आहे. लग्न सराई व यात्रांच्या हंगामात गेल्या तीन महिन्यांत ९७२ जणांना कुत्र्यांनी चावा घेतल्याच्या नोंदी मंचर उपजिल्हा रुग्णालय व घोडेगाव ग्रामीण रुग्णालयात आहेत. विशेषतः लहान मुलांना चावा घेतल्याच्या घटनांचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे उन्हाळ्याची सुट्टी असूनही मुलांना घरातच बसावे लागत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
लग्न सराई व यात्रांचा हंगाम सुरु असल्याने सार्वजनिक ठिकाण व मंगलकार्यालयात जेवणावळी झाल्यानंतर अनेकदा ताटात शिल्लक राहिलेले अन्न उघड्यावरच टाकून दिले जाते. परिणामतः तेथे भटक्या कुत्र्यांच्या टोळ्या तळ ठोकून असतात.

तेलकट पदार्थांचे सतत सेवन केल्याने कुत्री पिसळण्याची संख्या वाढते. अंगणात खेळणाऱ्या किंवा रस्त्याने ये-जा करताना हातात खाद्यपदार्थ असलेल्या लहानग्यांवर कुत्री हल्ला करतात.आंबेगाव तालुक्यात १०३ ग्रामपंचायती आहेत.

लहान गावांमध्ये सरासरी १५ ते २० व मोठ्या गावांमध्ये २५-५० हून अधिक मोकाट व भटक्या कुत्र्यांचा वावर आहे. त्यामुळे भटक्या कुत्र्यांच्या समस्येने नागरिक त्रस्त झाले आहेत.

आंबेगाव तालुक्यात भटक्या कुत्र्यांप्रमाणे घरगुती पाळीव कुत्र्यांनीही चावा घेतलेल्या घटनांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. गावपातळीवर सर्व कुत्र्यांचे सर्वेक्षण करून ग्रामपंचायत व मंचर नगरपंचायत स्तरावर सर्व कुत्र्यांना प्रतिबंधात्मक रेबीज लस देण्याची मोहीम राबविण्याची गरज आहे.
- डॉ. तुषार पवार, आरोग्य अधिकारी आंबेगाव तालुका.

श्वानदंश झालेल्या २७५ जणांवर उपचार
आंबेगाव तालुक्यात मंचर उपजिल्हा रुग्णालय, घोडेगाव ग्रामीण रुग्णालय व नऊ प्राथमिक आरोग्य केंद्र कार्यक्षेत्रात जानेवारी ते मार्च या कालावधीत एकूण ९७२ जणांना श्वानदंश झाले असून, त्यांच्यावर उपचार करण्यात आले आहेत. मंचर उपजिल्हा रुग्णालयात सर्वाधिक श्वानदंश झालेल्या २७५ जणांना उपचार केल्याच्या नोंदी आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vidarbha Rain Forecast : ...अखेर मान्सून केरळमध्ये दाखल; विदर्भात पुढील 10-12 दिवस कसं असेल हवामान? यंदा 90 टक्के पावसाचा अंदाज

Chardham Yatra: बद्रीनाथ-केदारनाथ मंदिरासमोर 'छैंया-छैंया' गाण्यावर डान्स! मंदिर समिती अ‍ॅक्शन मोडमध्ये, VIP दर्शनासाठी नवी SOP जाहीर

Yavatmal Shaktipeeth Controversy : शक्तिपीठ महामार्गाच्या मोजणीत मोठा घोळ? शेकडो झाडांसह विहिरी गायब झाल्याचा शेतकऱ्यांचा आरोप; 451 आक्षेप दाखल

Tukaram Mundhe: 'तुकाराम मुंढेंना साखर आयुक्त करा!' माढ्यात दुग्धाभिषेक आंदोलन, शेतकरी-कार्यकर्त्यांची जोरदार मागणी

Mukesh Ambani: मुकेश अंबानींना मोठा धक्का! श्रीमंतांच्या यादीत तिसऱ्या स्थानी घसरण; अदानी पुन्हा नंबर 1, अंबानींना मागे टाकणारा कोण?

SCROLL FOR NEXT