पुणे

मंचरमध्ये ज्येष्ठ महिलेचा खून

CD

मंचर, ता. ९ : अंगावर असलेले सोन्याचे दागिने चोरून नेत असताना विरोध करणाऱ्या ७८ वर्षांच्या वृद्ध महिलेचा तोंड मातीत दाबून परिचित असलेल्या २५ वर्षांच्या कामगारानेच खून केल्याची धक्कादायक घटना मंचर (ता. आंबेगाव) येथे सोमवारी (ता. ८) दुपारी घडल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले. अंजनाबाई प्रभाकर बाणखेले असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे, अशी माहिती मंचर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सतीश होडघर यांनी दिली.
अंजनाबाई या मंचर येथील पांढरी मळा येथे एकट्या राहत होत्या. त्यांना तीन मुलगे व तीन मुली आहेत. मुलगे व सुना कामानिमित्त मुंबई येथे वास्तव्यास आहेत. एक कामगार नेहमी त्यांना मदत करण्याच्या बहाण्याने घरी येत होता. त्याची नजर त्यांच्या गळ्यातील व कानातील दागिन्यावर होती. सोमवारी दुपारी दोनच्या सुमारास अंजनाबाई या घरातून बाहेर पडल्या. नेहमीप्रमाणे त्यांच्या मुलांनी मुंबईहून त्यांना तीन-चार वेळा मोबाईल केला. मात्र, मोबाईल बंद असल्याचे लक्षात आले. त्यामुळे त्यांनी शेजाऱ्यांना चौकशी करायला सांगितले. पण, त्या घरी नव्हत्या. त्यामुळे आजूबाजूच्या लोकांनी त्यांचा शोध सुरू केला. परिसरात असलेल्या उजव्या कालव्यातही पाहणी केली. पण, त्या मिळाल्या नाहीत.
त्यामुळे पाणीपुरवठा योजनेचे अध्यक्ष वसंतराव विष्णू बाणखेले यांनी अंजनाबाई या हरवल्याची तक्रार मंचर पोलिस ठाण्यात सोमवारी रात्री दाखल केली. दरम्यान, भाजपचे आंबेगावचे नेते संजय थोरात, वसंतराव बाणखेले, रवींद्र गांजाळे, पोलिस निरीक्षक सतीश होडघर व पोलिस पथकाने राहत्या घर परिसरात शोध सुरू केली. घरापासून साधारण तीनशे मीटर अंतरावर गवतामध्ये अंजनाबाई यांचा मृतदेह आढळून आला. गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र कानातील रिंगा चोरट्याने चोरून नेल्या होत्या. हातातील पाटल्या काढताना न आल्याने त्या तशाच होत्या.
दरम्यान, फरारी असलेल्या परिचित कामगाराने एकाकडून उसणे पैसे घेतले होते. त्या व्यक्तीला पैशाच्या मोबदल्यात दागिने दिल्याचे तपासात पोलिसांना व स्थानिकांना समजले. त्यानुसार या कामगाराने अंजनाबाई यांचा खून केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. आरोपीचे मोबाईल लोकेशन मिळाले आहे. मंचर पोलिस त्याच्या मागावर आहेत. त्याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया मंचर पोलिसांनी सुरू केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar : सत्ता नसतानाही विकास करता येतो

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 9 मे 2024

Loksabha Election 2024 : मतदानासाठी परदेशातील पुणेकर शहरात दाखल

Loksabha Election 2024 : बारामतीत वाढलेली लाखभर मते ठरविणार खासदार ; एकूण ५९.५० टक्के मतदान,पुरुषांचा टक्का वाढला, महिलांचा प्रतिसाद कमी

Latest Marathi News Live Update : महिला अपहरणप्रकरणी रेवण्णा यांना सात दिवसांची न्यायालयीन कोठडी

SCROLL FOR NEXT