पुणे

एकलहरे येथे बाह्यवळणावर अपघातांत वाढ

CD

मंचर, ता. १६ : पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर एकलहरे (ता. आंबेगाव) येथे बाह्यवळण जुन्या व नव्या हमरस्त्यावर शिंदेवाडी फाट्याजवळ तीव्र उतार आहे. त्यामुळे येथे रविवारी (ता. १४) दिवसा व रात्री असे दोन अपघात झाले. अपघात रोखण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग विभागाने मंचरच्या दिशेने येत असताना उताराला ३०० मीटर अंतरावर १५ पट्ट्याचे रबरी स्पीड बेकर बसवावेत, अशी मागणी एकलहरे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच संतोष डोके व ग्रामपंचायत सदस्य प्रदीप शिंदे यांनी केली.
मंचरच्या बाजूने भरधाव वाहने येतात. दरम्यान, त्याचवेळी विरुद्ध दिशेने कळंबहून येणारी वाहने दिसत नाही. परिणामतः दर आठवड्याला चार ते पाच अपघात होतात. गेल्या दोन महिन्यात लहान-मोठे तीस अपघात झाल्याची नोंद आहे. सध्या येथे स्पीड ब्रेकर आहेत. परंतु, वेग नियंत्रणासाठी त्याचा उपयोग होत नसल्याचे परिसरात राहणाऱ्या व्यावसायिकांनी सांगितले.
“कळंब येथील माध्यमिक शाळेत ये-जा करण्यासाठी ५० विद्यार्थी व दररोज १००हून अधिक शिंदेवाडी गावकऱ्यांना राष्ट्रीय महामार्ग ओलांडताना कसरत करावी लागते. नागरिकांच्या सुरक्षित प्रवासासाठी शिंदेवाडीकडे ये- जा करण्यासाठी राष्ट्रीय महामार्गाखाली भूमिगत रस्ता करावा.” अशी मागणी माजी उपसरपंच नवनाथ शिंदे व बाळासाहेब शिंदे यांनी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT