पुणे

‘शिक्षण, नोकरीसाठी लागणारे दाखले त्वरित मिळावेत’

CD

मंचर, ता. ७ : “सध्या शासनस्तरावर विविध शासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी व नोकरीसाठी लागणारे दाखले मिळण्यास अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. याबाबत योग्य त्या उपाययोजना हाती घेऊन विद्यार्थ्यांना लागणारे दाखले त्वरित उपलब्ध करून द्यावे,”अशी मागणी भाजप किसान मोर्चाचे पुणे जिल्हाध्यक्ष संजय थोरात यांनी केली आहे.
याबाबतचे निवेदन थोरात यांनी मंचर (ता. आंबेगाव) येथील प्रांत कार्यालयात आंबेगाव-जुन्नर विभागाचे प्रांत अधिकारी गोविंद शिंदे यांना दिले. यावेळी नवनाथ थोरात, उत्तम राक्षे, कालिदास गांजाळे, स्नेहल चासकर, विजय शिंदे, अक्षय थोरात, गणेश थोरात उपस्थित होते.
“दहावी बारावीचे निकाल लागले आहेत. महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. तसेच सध्या जून-जुलै या महिन्यामध्ये महाराष्ट्र शासनाच्या ७५००० नोकर भरतीसाठी विविध शासकीय पदाच्या जाहिराती प्रस्तावित आहेत. त्यासाठी रहिवासी दाखला, जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, नॉन क्रिमिलेयर दाखला, जात पडताळणी दाखला अशा प्रकारची कागदपत्रे आवश्यकतेनुसार लागत आहेत. योग्य त्या उपाययोजना हाती घेऊन त्वरित दाखले उपलब्ध करून द्यावे.” असे थोरात यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cigarette: धूम्रपान करणाऱ्यांना मोठा धक्का! सिगारेटच्या किमती ५५ रुपयांनी वाढल्या; तुमच्या आवडत्या ब्रँडचा नवीन दर किती? जाणून घ्या...

PAK vs AUS: पाकिस्तानी चिटर! Out नसताना ऑस्ट्रेलियन फलंदाजाला अंपायरने दिले बाद, Video Viral

Latest Marathi News Live Update: कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा ‘गोदावरी गौरव’ पुरस्कार जाहीर, 6 जणांचा होणार सन्मान

Rohit Shetty murder plot : लॉरेन्स टोळीने रचला होता रोहित शेट्टीच्या हत्येचा कट? ; ‘FIR’मधून खळबळजनक माहिती उघड!

Urdu Schools Timing: उर्दू शाळांच्या वेळा बदलणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय, कारण काय? जाणून घ्या...

SCROLL FOR NEXT