पुणे

नगरला पाणी देण्याचा प्रश्‍न सांमज्यसाने सोडवू

CD

मंचर, ता. ८ : आंबेगाव तालुक्यातील देशभक्त हुतात्मा बाबू गेनू जलाशय (डिंभे) धरण बोगद्यातून नगर जिल्ह्याला पाणी देण्याचा मुद्दा कोणीही भावनिक करू नये. लाभधारकांवर अन्याय होऊ देणार नाही. कॅबिनेट मंत्री दिलीप वळसे पाटील, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, माजीमंत्री बबनराव पाचपुते यांच्यासह आम्ही एकत्रित बसून हा प्रश्न सामंजस्याने सोडवू "असे राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.
लांडेवाडी (ता. आंबेगाव )येथे आढळराव पाटील यांच्या निवासस्थानी शनिवारी (ता.८ ) रात्री झालेल्या पत्रकार परिषदेत विखे पाटील बोलत होते. डिंभेधरणातून बोगदा पाडून नगर जिल्ह्यात पाणी नेण्यास वळसे पाटील,आढळराव पाटील यांच्यासह सर्वपक्षीय कार्यकर्ते व शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे. असा प्रश्न पत्रकारांनी उपस्थित केल्यानंतर विखे पाटील म्हणाले, की "डिंभे धरणातून नगर जिल्ह्यात जाणाऱ्या कालव्यासाठी सध्या कमी क्षमतेने पाणी मिळत आहे. कुकडी प्रकल्पाच्या आराखड्याप्रमाणे पाणी मिळावे, अशी यापूर्वी चर्चा झाली आहे. पण आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यावरही अन्याय होऊ देणार नाही. त्यांच्याही भावना समजून घेतल्या जातील. दिलीप वळसे पाटील सरकारमध्ये सहभागी झाल्याबद्दल मी त्यांचे स्वागत करतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Drought 2026 : राज्यातील २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर; फडणवीस सरकारचा मोठा निर्णय, ट्रिगर-१ लागू झालेल्या तालुक्यांतील शेतकऱ्यांना तातडीने मदत

शेवटचे २४ तास! CJP ने ज्ञानेश कुमारांना पुन्हा दिला इशारा, राजीनाम्यासाठी आक्रमक; २ ऑक्टोबरपासून आंदोलनावर ठाम

Sign Language Day: आता खुणांच्या भाषेतही ऐकणार पोलिस; कर्णबधिर नागरिकांसाठी पोलिसांचे विशेष प्रशिक्षण

Latest Marathi News Live Update : राज्यातील ३५८ पैकी २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मोठा निर्णय

Asian Games 2026 Kabaddi: भारतीय महिलांची 'सुवर्ण' पकड! इराणची कडवी टक्कर मोडली अन् शेवटच्या क्षणाला बाजी मारली

SCROLL FOR NEXT